Dombivli crime news reel star arrested with weapons Sarkarnama
मुंबई

Dombivli Crime News: ‘रील स्टार’ पुन्हा अटकेत; पोलिसांना सापडली धारदार शस्त्रे, डोंबिवलीमध्ये काय घडलं?

Reel Star Surendra Patil Arrested: जप्त करण्यात आलेल्या बंदुकांमध्ये ५ देशी पिस्तुले आणि रिव्हॉल्वरचा समावेश असून काही शस्त्रांवर ‘मेड इन युएसए’ आणि ‘स्पेशल ऑटो' अशी नोंद आढळली आहेत.

शर्मिला वाळुंज

Dombivli police action against reel star: सोशल मीडियावर ‘गँगस्टर स्टाईल’ व्हिडिओमुळे चर्चेत आलेले ‘रील स्टार’ सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय ५५) यांना ठाणे गुन्हे शाखेने पुन्हा अटक केली आहे. डोंबिवलीतील दावडी परिसरातील त्यांच्या बंगल्यावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान घरातील शू रॅकमध्ये लपवून ठेवलेला एक गुप्त कप्पा आढळून आला. त्या कप्प्यातून ७ बंदुका, ३७१ जिवंत काडतुसे आणि १६७ एअर गनच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय तलवारी, चाकू, कोयते यांसारखी धारदार शस्त्रेही पोलिसांच्या हाती लागली. या सर्व शस्त्रांची अंदाजे किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

जप्त करण्यात आलेल्या बंदुकांमध्ये ५ देशी पिस्तुले आणि रिव्हॉल्वरचा समावेश असून काही शस्त्रांवर ‘मेड इन युएसए’ आणि ‘स्पेशल ऑटो' अशी नोंद आढळली आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण शस्त्रसाठा वापरासाठी सज्ज अवस्थेत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

सुरेंद्र पाटील हे व्यवसायाने बिल्डर असून त्यांच्या विरोधात यापूर्वी बलात्कारासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच ते एका प्रकरणात जामिनावर बाहेर आले होते. मात्र अल्पावधीतच पुन्हा अटकेमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पाटील यांचे इंस्टाग्रामवर तीन लाखांहून अधिक अनुयायी असून ते या शस्त्रांचा वापर केवळ व्हिडिओंसाठी ‘प्रॉप्स’ म्हणून करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळला नसून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

मोठ्या रॅकेटचा संबंध आहे का?

या प्रकरणी आर्म्स अ‍ॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्रसाठा नेमका कुठून आला, त्यामागे कोणाचा हात आहे आणि यामध्ये मोठ्या रॅकेटचा संबंध आहे का, याचा तपास सुरू असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT