Eknath Khadse-Mandakini Khadse Sarkarnama
मुंबई

Mandakini Khadse: मोठी बातमी ! खडसेंपाठोपाठ पत्नी मंदाकिनी यांनाही दिलासा; भोसरी जमीन प्रकरणात नियमित जामीन मंजूर

Eknath Khadse and Mandakini Khadse : कोर्टाने ईडीचा दावा फेटाळत ईडीवरच जोरदार ताशेरे ओढले.

Ganesh Thombare

Mumbai News: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात गुरुवारी नियमित जामीन मंजूर झाला. त्यानंतर आता खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात विशेष पीएमएलए कोर्टाने नियमित जामीन मंजूर केला. मंदाकिनी खडसे यांना दोन लाखांच्या जातमुचलक्यावर हा नियमित जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ मंदाकिनी खडसे यांनाही दिलासा मिळाला आहे.

मंदाकिनी खडसे या तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा ईडीने कोर्टात केला. मात्र, कोर्टाने ईडीचा दावा फेटाळत ईडीवरच ताशेरे ओढले. 'गुन्हा दाखल होऊन दोन वर्षे झाले, मग तपासात सहकार्य करत नसेल तर अटक का करण्यात आली नाही, या केसचा अद्याप फायनल रिपोर्ट दाखल का नाही केला ?', असे प्रश्न कोर्टाने विचारले.

मंदाकिनी खडसे यांचा नियमित जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, परदेशात जाण्यासाठी कोर्टाची परवानगी बंधनकारक असल्याची अट घालण्यात आली. तसेच तपासात अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे सांगत या प्रकरणाशी संबंधित पुराव्यांशी छेडछाड न करण्याचे कोर्टाने सुनावले.

भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसेंना दिलासा

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात गुरुवारी नियमित जामीन मंजूर झाला. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला. भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी खडसेंवर ईडीने गुन्हा दाखल केला होता, तर याच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका सोमवारी हायकोर्टाने फेटाळली होती. मात्र, भोसरी जमीन प्रकरणात गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयाने त्यांचा नियमित जामीन मंजूर केला.

काय आहे भोसरी जमीन घोटाळा प्रकरण ?

पुण्याच्या भोसरी येथील एमआयडीसीच्या भूखंड खरेदीमध्ये एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. भोसरी येथील जमिनीचा मूळ बाजारभाव 31 कोटी रुपये असताना खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी फक्त तीन कोटी रुपयांना विकत घेतली होती.

मात्र, ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्यामुळे इतक्या कमी किमतीत कशी विकत घेण्यात आली? हा व्यवहार एवढ्या कमी किमतीत कसा झाला? असे अनेक प्रश्न त्यानंतर उपस्थित करण्यात आले होते. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT