Jalgaon Politics : रावेर लोकसभेत एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन हायव्होल्टेज लढत होणार ?

Raver Lok Sabha Seat Election : रक्षा खडसे यांना भाजपने तिसऱ्यांदा दिली तर सासरा विरुद्ध सून अशी लढत होईल का ?
Jalgaon Politics
Jalgaon PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मंत्री गिरीश महाजन यांची लढत होण्याची शक्यता असणार आहे. तसे झाल्यास राज्यातील हा हाय होल्टेज सामना असेल. (Latest Marathi News)

एकनाथ खडसे यांनी लोकसभेचे शिवधनुष्य उचलावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. आज जळगांव येथे जाहीर सभेत व्यक्त केले, यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यामुळे आता खडसे रावेर लोकसभा निवडणूक लढणार काय ? या बाबत चर्चा सुरू झाली आहे.

Jalgaon Politics
Eknath Khadse Lok Sabha Candidate : एकनाथ खडसे जळगावमधून राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार ; जयंत पाटील यांचे स्पष्ट संकेत

या अगोदरही राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना खडसे यांनी रावेर लोकसभा निवडणूक लढवावी अशी चर्चा अमळनेर दौऱ्याच्या वेळेस शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली होती. त्यामुळे आता खडसे याना लोकसभेचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने निश्चित केल्याचे दिसून येत आहे. वास्तविक खडसे यांची या मतदारसंघावर चांगली पकड आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत भाजपचा उमेदवार या मतदारसंघात निवडून आला आहे. आज त्यांच्या सून रक्षा खडसे या मतदार संघात भाजपच्या खासदार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी खडसे हे भारतीय जनता पक्षात होते.

महाविकास आघडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा मतदारसंघ आपल्याकडे घेणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे या गटातर्फे एकनाथ खडसे हे प्रबळ उमेदवार ठरतील, हा मतदारसंघ लेवा पाटील बहुल असल्याचे आजपर्यंत झालेल्या निकालावरून दिसून आलेले आहे. शरद पवार यांना मानणारा मराठा समाजही सोबत असेल, मुस्लिम समाजाची मतेही आघाडीच्या बाजूने असल्याचे सांगितले जाते. या शिवाय खडसे यांना वैयक्तिक मानणारा वर्गही मोठा आहे. त्यामुळे खडसे यांच्या दृष्टीने या जमेच्या बाजू आहेत.

Jalgaon Politics
Girish Mahajan On Maratha Protest : निर्णयासाठी सरकार एक महिन्याचा वेळ मागणार ; महाजन अंतरवालीत..

एकनाथ खडसे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून कोण उमेदवार असणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पक्ष तिसऱ्यांदा उमेदवारी देणार काय ? जर असे झाले तर सासरा विरुद्ध सून अशी लढत होईल का ? मात्र ही शक्यता फार कमी दिसत आहे.असे झाले तर खडसे घराण्यात हा संघर्ष टाळून कोणीतरी एकच उभे राहील हे निश्चित आहे.

रक्षा खडसे यांना यावेळी उमेदवारी नाकारून भाजपने नवीन उमेदवार देण्याचे ठरविले तर सद्या माजी खासदार यांचे चिरंजीव अमोल जावळे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे, परंतु समोर एकनाथ खडसे असतील तर जावळे यांच्याबाबत पक्ष विचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेवढ्या ताकदीचा उमेदवार खडसे यांच्या समोर देवून यश मिळविण्याचा भाजप विचार करणार त्यावेळी राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांचे नाव समोर येईल, प्रश्न राहील तो समाजाचा परंतु या मतदार संघात लेवा पाटील अधिक असले तरी तेवढ्याच संख्येने मराठा मतदार आहेत.तसेच गुजर, कोळी, बौद्ध, वंजारी समाजाचे मतदान आहे.

Jalgaon Politics
Ajit Pawar News : लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले असे सिद्ध झाले तर... अजितदादांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने सर्वच मराठा समाज शरद पवार यांच्या सोबत जाण्याची शक्यता नाही. अजित पवार यांच्या सोबतही काही मराठा समाज जाणार आहे, पक्षफुटीनंतर अजित पवार अद्याप जळगाव जिल्ह्यात आलेले नाहीत, शरद पवार यांनी आज पहिली सभा घेतली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.अजित पवार यांनी जळगावात सभा घेतल्यानंतर त्यांना किती प्रतिसाद मिळतो, यावरून गणित लेखाजोखा होवू शकतो. त्यामुळे काही मराठा समाज भाजप सोबत असणार आहे, विशेष म्हणजे जामनेर तालुका मराठा बहुल आहे.

या ठिकाणी मराठा उमेदवार असतानाही विधानसभेत गिरीश महाजन मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यामुळे जामनेर तालुका त्यांना मताधिक्य देईल, असे शक्यता आहे. मुक्ताईनगर येथे शिंदे गटाचे मराठा आमदार आहेत, त्यामुळे तेथील मराठा मते तसेच इतर समाजातील भाजपची मते, रावेर भागात मोठ्या संख्येने मराठा, गुजर आहेत ही सुध्दा जमेची बाजू राहणार आहे.

चोपडा भाग मराठा व आदिवासी बहुल आहे. तसेच आतापर्यंत लोकसभा निवडणुकीत या मतदार संघात भाजपच्या उमेदवाराला अधिक मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे महाजन या ठिकाणीही मते घेतील. भुसावळ हे जिल्ह्यातील मेट्रोपॉलिटन शहर आहे, इथे सर्व समाज असला तरी लेवा पाटील समाज अधिक आहे, मात्र इतर समाजावर तसेच भाजपला मानणारा लेवा पाटील समाजही आहेच. त्यामुळे भाजपचं पारड येथेही जड असेल.

Jalgaon Politics
Pankaja Munde News : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची मोठी घोषणा, म्हणाल्या,'' २०२४ च्या विधानसभा निवडणुकीआधी...

सावदा, फैजपूर, यावल भागात मात्र भाजप पिछाडीवर राहण्याची शक्यता राहील परंतु, इतर तालुके भरून काढतील शिवाय भाजपचे नेते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,आणि मुख्य म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या विश्वासू मित्रासाठी पूर्ण ताकत लावून आपले कट्टर विरोधक खडसे यांना पराभूत करण्यासाठी पूर्ण ताकद लावतील.

विशेष, म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गूडबुक मध्ये गिरीश महाजन असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा आणि नरेंद्र मोदी यांचा वरदहस्त अधिक असेल, परिणामी महाजन यांचा विजय दृष्टिपथात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकंदरीत रावेर लोकसभा राज्यातील महत्वपूर्ण निवडणूक असेल एवढे मात्र नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com