Mumbai : मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याप्रकरणी अनिल परब यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर यातील चार जणांना पोलिसांनी अटकही केली आहे.
या मारहाण प्रकरणी अटक टाळण्यासाठी अनिल परब यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता अनिल परबांना मुंबई सत्र न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. चार जुलैपर्यंत अटक अथवा कारवाई न करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
मुंबईतील वांद्रे येथील ठाकरे गटाचे पक्ष कार्यालय मुंबई महापालिकेने अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत पाडले होते. त्या निषेधार्थ ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान आंदोलनकर्त्यांनी अभियंत्याला मारहाण केली होती.
याप्रकरणी अटक टाळण्यासाठी अनिल परब यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. परब यांच्यासह सहा जणांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. त्याच्या या अर्जावर शुक्रवारी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने चार जुलैपर्यंत अटक अथवा कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनिल परबांना काहीसा मोठा मिळाला आहे.
नेमकं घटना काय?
ठाकरे गटाची मुंबईच्या वांद्रे परीसरातील शाखा अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत त्या शाखेच्या बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारवाई वेळी शाखेत बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होते, ते फोटो काढू न दिल्याचा दावा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट पालिकेत जाऊन कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला पोलिसांसमोरच मारहाण केली होती.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.