Thackeray- Shinde Politics: बीएमसी कर्मचारी मारहाण प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल; चार जणांना अटक

महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयातील असिस्टंट इंजिनियर पाटील यांना सोमवारी (२६ जून) शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली
Thackeray Group Beat BMC Officer
Thackeray Group Beat BMC OfficerSarkarnama

Mumbai Politics: महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयातील असिस्टंट इंजिनियर पाटील यांना सोमवारी (२६ जून) शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिवसेना गटाचे आमदार आणि विभाग प्रमुख अॅड. अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या वाकोला पोलिसांनी शिवसेना गटाचे आमदार आणि विभाग प्रमुख अॅड. अनिल परब यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तर आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी इतर फरार असलेल्या आरोपींचा वाकोला पोलीस शोध घेत आहेत.

मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्याचा तक्रारी वरून वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, धमकावणे, आणि हेतुपुरस्पर गुन्हा करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर वाकोला पोलिसांनी माजी नगरसेवक सदा परब, माजी नगरसेवक हाजी हलीम खान, शाखाप्रमुख संतोष कदम, शाखाप्रमुख उदय दळवी यांना अटक केली. सध्या वाकोला पोलिसांनी वेगवेगळ्या टीम बनवून फरार आरोपीची धरपकड सुरू केली आहे. (Anil Parab News)

Thackeray Group Beat BMC Officer
Ram Satpute's mother Passed Away : भाजप आमदार राम सातपुते यांना मातृशोक; जिजाबाई सातपुते यांचं निधन!

नेमकं काय घडलं?

ठाकरे गटाची मुंबईच्या वांद्रे परीसरातील शाखा अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत त्या शाखा तोडण्यात आली. पण या कारवाई वेळी शाखेत बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होते, ते फोटो काढू न दिल्याचा दावा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. यामुळे संतप्त शिवसैनिकांनी थेट पालिकेत जाऊन कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला पोलिसांसमोरच मारहाण केली.

Thackeray Group Beat BMC Officer
KCR Maharashtra Visit : 'केसीआर' सोलापूरात, मग चर्चा तर होणारच! 'या' भेटीने मात्र उडाली खळबळ

या प्रकारावर अनिल परब काय म्हणाले?

"अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत आमचं काहीही म्हणणं नाही. मात्र, ज्या शाखेवर पालिका कारवाई करत होती, त्या शाखेत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होते. आम्ही फोटो काढून घेतो. आम्हाला थोडा वेळ द्या, असं आमचे कार्यकर्ते सांगत होते.

पण तरीही महापालिकेच्या ती शाखा तोडली. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले. आजही आम्ही पाण्यासाठी मोर्चा काढला होता, पण यावेळीच कार्यकर्त्यांना उद्रेक झाला", असंही अनिल परब यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com