Thackeray Group: ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Thackeray Group Beat BMC Officer: ठाकरे गटाच्या या शाखेवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
Thackeray Group Beat BMC Officer
Thackeray Group Beat BMC OfficerSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे. या मारहाणीचा व्हिडिओही समोर आला आहे. मुंबईच्या वांद्रे परीसरातील ठाकरे गटाची शाखा अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या शाखेवर कारवाई केली. या शाखेचं अनधिकृत बांधकाम असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

ठाकरे गटाच्या या शाखेवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. वांद्रे परिसरातील शाखेवर कारवाई करण्यात आली त्यावेळी शाखेतील बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढू न दिल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे. महापालिकेत झालेल्या या राड्याची सध्या मोठी चर्चा रंगली आहे.

Thackeray Group Beat BMC Officer
K.Chandrasekhar Rao News : केसीआर यांचे लक्ष राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर; आघाडीचे गणित बिघडवणार?

नेमकं काय घडलं?

ठाकरे गटाची मुंबईच्या वांद्रे परीसरातील शाखा अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत त्या शाखेच्या बांधकामावर जेसीबी चालवत कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारवाई वेळी शाखेत बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होते, ते फोटो काढू न दिल्याचा दावा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट पालिकेत जाऊन कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला पोलिसांसमोरच मारहाण केल्याचा प्रकार घडला.

Thackeray Group Beat BMC Officer
KCR In Solapur : केसीआर आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह सोलापुरात दाखल; BRSच्या ४०० नेत्यांसाठी २१० खोल्या बुक

या प्रकारावर अनिल परब काय म्हणाले?

"अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत आमचं काहीही म्हणणं नाही. मात्र, ज्या शाखेवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली. त्या शाखेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होते. कारवाईवेळी आमचे कार्यकर्ते त्यांना सांगत होते, या आम्हाला वेळ द्या, आम्ही फोटो काढून घेतो.

मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्याने जेसीबी चालवत ती शाखा तोडली. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले. आज आम्ही पाण्यासाठी मोर्चा काढला होता, पण यावेळीच कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला", असं स्पष्टीकरण यावर बोलताना अनिल परब यांनी दिलं. दरम्यान, या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com