Rohit Pawar On ED  Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar On ED : ईडीच्या कारवाईने मी विचार बदलेन... : रोहित पवारांनी ठणकावले!

Rohit Pawar On Baramati Agro : मला ईडीची नोटीस आली तर...

Chetan Zadpe

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाड टाकण्यात आली होती. कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) ही छापेमारी केली होती. आता यावर स्वत: रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन, सर्व प्रश्नांवर उत्तरे देत, भाजपवर प्रश्नांचा भडिमार केला. (Latest Marathi News)

रोहित पवार म्हणाले, 'ईडी'च्या कारवाईला मी घाबरत नाही. माझा आक्षेप ईडीच्या अधिकाऱ्यांवर नाही. त्यांना जे टास्क दिलं जातं, ते करतात आम्ही ईडीच्या सर्व कारवाईला सहकार्य करतो. आताच नाही यापूर्वी राज्य आणि केंद्राच्या तपास यंत्रणांनी माझ्यावर कारवाई केली आहे. प्रत्येक वेळी मी योग्य ते सहकार्य केले आहे. सर्व कागदपत्रे दिली आहेत."

मला भाजपला एक प्रश्न विचारायचं आहे की, इतर पक्षांतून तुमच्याकडे आलेल्या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई केली का? त्याचं काय करणार आहात? माझ्यावर आरोप करणाऱ्यांना सांगतो की, मी राजकारणात येण्याआधीपासून बिझनेसमन आहे. एवढी बाब लक्षात घ्यावी, मला ईडीची नोटीस आली तर मी चौकशीला जाईन, सर्व प्रक्रिया पार पाडेन, पण यामुळे विचार बदलेन किंवा बाजू बदलेन असं होणार नाही, असे रोहित पवार म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT