Nagpur Winter Session : शिक्षक भरतीवरुन रोहित पवार कडाडले ; शिक्षणमंत्री खोटे बोलतात..!

Rohit Pawar says : राज्यात सुमारे ६२ हजार शिक्षकांची पदे रिक्त, भरती रखडल्याने संताप व्यक्त..
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Winter Session : राज्यात रखडलेल्या शिक्षक भरतीवरुन तसेच कंत्राटी शिक्षक भरतीवरून आमदार रोहित पवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. शिक्षणमंत्री धडधडीत खोटे बोलत असल्याचा आरोप यावेळी पवार यांनी केला. नागपूर हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावरुन पवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्यातील कंत्राटी शिक्षक भरतीवरून राज्य सरकारला नागपूर हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session) घेरले. शिक्षणमंत्री धडधडीत खोटे बोलत असल्याकडे आरोप करत त्यांनी रखडलेल्या शिक्षक भरतीकडे शासनाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, "राज्यात 60 हजार जागांवर शिक्षक भरतीमध्ये बाकी आहे. मंत्री याबाबत धडधडीत खोटे बोलत आहे.

Rohit Pawar
Maharashtra Assembly Winter Session 2023 : देशातील सर्वात अत्याधुनिक हिरे व्यापार केंद्र सुरतेत नाही मुंबईत; फडणवीसांनी काय सांगितले?

ॲाक्टोबर महिन्यापर्यंत संपूर्ण भरती पूर्ण करू, असे सांगत आहे. भरती प्रक्रिया सुरू देखील झाली नाही. रोस्टर देखील झालेले नाही, पण मंत्री खोटे बोलत आहेत. शाळांची गुणवत्ता ठेवणे गरजेची आहे. गरिबांची मुलं या शाळांमध्ये शिक्षण घेतात. त्यामुळे शिक्षक आणि प्राध्यापक भरती झाली पाहिजे". शिक्षकांची कंत्राटी भरती मागे घेण्याची मागणी होती. तसा अध्यादेश देखील मागे घेतला.

परंतु मागच्या दाराने कंत्राटी भरती सुरूच आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सरकारचे अभिनंदन केले आहे, विदर्भातील सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा कंत्राटीपद्धतीने घेतले. हा प्रकार किती दिवस सुरू राहणार आहे, असा सवाल आमदार पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. राज्यात सुमारे 62 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यात जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या भरती प्रक्रियेबाबत पाच महिन्यापूर्वी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली होती. दोन टप्प्यात भरती प्रक्रिया राबवली जाईल. यात पहिल्या टप्प्या 23 हजार जागांवर भरती होईल. अनेक जिल्ह्यात खुलं आरक्षण राहिले नव्हते. त्यामुळे त्याची चौकशी होऊन भरती प्रक्रिया होईल. यासाठी पाच सप्टेंबरपूर्वी राज्यातील शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल उघडले जाईल, अशी माहिती केसरकर यांनी दिली होती.

मात्र शिक्षक भरतीवर कार्यवाही झाली नसल्याने पवार यांनी अधिवेशनात संताप व्यक्त केला.

अधिवेशनात एकही धोरणात्मक निर्णय नाही..

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून एकही धोरणात्मक निर्णय झाला नसल्यावरून आमदार रोहित पवार यांनी टीकास्त्र सोडले. अधिवेशनात शेतकरी, युवा, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी, अंगणवाडी सेविका या कोणत्याच घटकाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही.

त्यांचे प्रश्नही सुटले नाहीत. विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नावरही काही धोरणात्मक निर्णय झाला नाही. असे असेल, तर अधिवेशन काय केवळ टाईमपास करण्यासाठी घेत आहोत का? हा निर्लज्जपणा थांबला पाहिजे आणि सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Rohit Pawar
Bhandara : प्रशासनाच्या हलगर्जीने ‘ते’ 10 हजार जातात भलत्याच मार्गाने.. हा प्रकार काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com