Nagpur RSS Headquarter : नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस असचानाच नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) महायुतीच्या आमदारांचे बौद्धिक घेण्यात आलं. यासाठी सकाळपासूनच महायुतीचे आमदार संघ मुख्यालयात दाखल झाले होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे आमदार संघ मुख्यालयात दाखल झाले होते. संघ कार्यालात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंनी, संघ परिवार यांच्याशी माझे नाते लहानपणापासून आहे. तसंच संघाच्या शाखेतून माझी सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेनेच्या शाखेत मी दाखल झालो.
संघाचा आणि शिवसेनेचा विचार एकच असल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या याच वक्तव्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, "शिवसेना संघाचा विचार एक असल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं असेल पण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं संघाबाबत असं विधान कधीच नव्हतं.
त्यांनी शिवसेना (Shivsena) स्वतंत्र संघटना स्थापन केली. महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी मराठी माणसांच्या अस्मितेसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. भाजपचा आणि संघाचा संबंध असू शकतो. मात्र शिवसेनेचा संबंध कधीही संघाशी आला नाही, बाळासाहेबांनी येऊ दिला नाही. आमचं राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे. दुसऱ्या कोणत्याही संघटनेचं मांडलिक व्हावं आणि त्यांच्याकडे जाऊन बौद्धिक घ्यावी एवढी कंगाल शिवसेना बाळासाहेबांनी कधीच केली नव्हती.
पण आता जे लोक बौद्धिक घेत आहेत ही त्यांची लाचारी आहे. बाळासाहेबांचा वारसा उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत. मात्र, शिंदेंची सत्ता टिकवण्यासाठी ही लाचारी सुरू आहे. ईडी आणि सीबीआयपासून भीती असल्याने त्यापासून मुक्त होण्यासाठी सगळे लोक तिथे शेकोटीला गेले आहेत, अशा शब्दात राऊतांनी शिंदेंवर टीका केली. संघाची उपशाखा भाजप, बजरंग दल या आहेत. मात्र, शिवसेना स्वतंत्र संघटना आहे.
शिवाय काही संघचालकांसोबत बाळासांहेबांचे संबंध चांगले होते. आम्ही कधी त्यांच्यावर टीका केली नाही पण ते स्वतंत्र आहेत. त्यांनी त्याचं काम करावं आम्ही आमचं काम करावं, त्यांनी त्यांची संघटना वाढवली आम्ही पक्ष वाढवला. मात्र आता शिंदे स्वतंत्र राहिले नाहीत त्यांच्यावर आता नियंत्रण आहे. याचा अर्थ तुमचा ब्रेन वॉश झाला असल्याचंही राऊत म्हणाले.
दरम्यान, मी लहानपणापासून स्वयंसेवक आहे, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. त्यावर बोलताना राऊतांनी टोमणा लगावला, ते म्हणाले, "बापरे ! ही ऐतिहासिक गोष्ट आहे, त्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. ते लहानपणापासून स्वयंसेवक असतील तर ते शिवसैनिक कधी झाले ? याचा अर्थ ते शिवसैनिक नव्हते, याचा अर्थ ते बोगस शिवसैनिक होते, हे आता त्यांनी त्यांच्या तोंडाने उघड केलं."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.