Nagpur Winter Session: RSSमधूनच माझ्या राजकीय जीवनाची सुरवात; रेशीमबागेत शिंदेंचे डॉ. हेडगेवारांना अभिवादन!

DCM Eknath Shinde in RSS Office Nagpur: संघाच्या शाखेतून माझ्या राजकीय जीवनाची सुरवात ही संघातूनच झाली. फडणवीस हे संघाचे स्वयंसेवक आहेत, ते मुख्यमंत्री झाले ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मी यापूर्वीही रेशीमबागेत आलो आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: राष्ट्रीय स्वंयसेवक कार्यालयाकडून आज हिवाळी अधिवेशनाला उपस्थित असलेल्या महायुतीच्या आमदारांना संघाचे मुख्यकार्यालय असलेल्या रेशीमबागेत निमंत्रित करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्य अनेक आमदारही उपस्थित होते. रेशमीबागेच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांनी बोलताना माझ्या राजकीय जीवनाची सुरवात ही संघातूनच झाली असल्याचे सांगितले.

आज रेशीमबागेत जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर हेडगेवार यांच्या दर्शनाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, अशी प्रतिक्रियाही शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले, "संघ परिवारांशी माझे नाते लहानपणापासून आहे. मी लहानपणी संघाच्या शाखेत जायचो. संघ परिवार आणि शिवसेना यांचे विचार सारखेच आहेत. निरपेक्ष भावनेने कसे काम करावे, हे संघाकडून शिकावे. संघाच्या शाखेतून माझ्या राजकीय जीवनाची सुरवात ही संघातूनच झाली. फडणवीस हे संघाचे स्वयंसेवक आहेत, ते मुख्यमंत्री झाले ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मी यापूर्वीही रेशीमबागेत आलो आहे.

Eknath Shinde
Maharashtra Assembly Winter Session LIVE : काँग्रेस कार्यालयावरील हल्लाप्रकरणी 12 कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

संघाची शिकवण जोडण्याची आहे, तोडण्याची नाही, मला संघपरिवार नवा नाही, असे सांगत शिंदे म्हणाले, " फडणवीस हे संघाचे स्वयंसेवक आहेत, ते मुख्यमंत्री झाले ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. संघाच्या 5 लाख शाखा आहेत, राष्ट्रउभारणीत संघाचे मोठे काम आहे. कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, संघाचा स्वंयसेवक काम करीत असतो. पुढच्या वर्षी संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे,"

Eknath Shinde
Nagpur RSS : अजितदादांचा 'तो' एकमेव आमदार संघाच्या मुख्यालयात पोहोचलाच, म्हणाला, "पक्षाकडून..."

"रेशीमबागेत आल्यानंतर प्रेरणा मिळते. समाजकारण करणाऱ्या प्रत्येकाने रेशीमबागेत यावे," असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघाच्या या बौद्धीकला दांडी मारली आहे.राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे हे एकमेव आमदार यावेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com