Rupali Chakankar seen with Ashok Kharat in viral images, sparking controversy and political debate around the Kharat case. Sarkarnama
मुंबई

Sunil Tatkare : रूपाली चाकणकरांचा राजीनामा घेणार का? खरात प्रकरणावर अखेर राष्ट्रवादीची भूमिका सुनील तटकरेंनी केली स्पष्ट

Sunil Tatkare On Rupali Chakankar controversy : 'राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रफुल पटेल यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, भोंदूबाबाचे जे काही प्रकार आहेत ते अतिशय वाईट आणि घाणेरडा आहे. अशोक खरातवर सक्त कारवाई केली पाहिजे, आणि जे लोक त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्यावर सुद्धा सक्तीने कारवाई केली पाहिजे.'

Jagdish Patil

Rupali Chakankar Controversy : दैवी शक्ती आणि ज्योतिषाच्या नावाखाली महिलांचं शारीरिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखत त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून २४ मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

मात्र, या विकृत खरातला आपला गुरू मानत त्याची पाद्यपूजा केल्याच्या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत सापडल्या आहेत. चाकणकर यांचे खरातसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

शिवाय या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. तर आज सकाळी रायगडमध्ये पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांना खरात प्रकरणावरून रुपाली चाकणकरांबाबत प्रश्न विचारला असता ते चांगलेच संतापले आणि मला घटनेने आधिकार दिला आहे, मला ज्यावेळी बोलायचं आहे, त्यावेळी मी बोलेन, असं म्हणत त्यांनी बोलणं टाळलं.

मात्र, त्यांच्या या संतापामुळे आणि बोलणं टाळल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे अखेर आता त्यांनी एक्सवर पोस्ट करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सुनील तटकरेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'नाशिकच्या खरात प्रकरणाच्या अनुषंगाने जी काही माहिती बाहेर येते आहे, ती उद्विग्न करणारी आहे.

देवाच्या आणि श्रद्धेच्या नावाने अशा काही गोष्टी होतील अशी कल्पना मी किंवा कोणीच कधीही करू शकत नाही. सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येकाचाच अनेक व्यक्तींशी तसेच संस्थांशी संपर्क येतो. अनेकदा या संपर्काचे स्वरूप थेट स्वरूपाचे असतेच असे नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की, एखादे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घातले जाईल. उलट या प्रकरणातील पीडितांनी समोर येऊन पोलिसात तक्रार नोंदवावी.

आमचे सरकार या प्रकरणात ठाम भूमिका घेऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सुद्धा या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने काय पावलं उचलायला हवीत ती आम्ही उचलू.', असं म्हणत त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रफुल पटेल यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, भोंदूबाबाचे जे काही प्रकार आहेत ते अतिशय वाईट आणि घाणेरडा आहे. अशोक खरातवर सक्त कारवाई केली पाहिजे, आणि जे लोक त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्यावर सुद्धा सक्तीने कारवाई केली पाहिजे.

त्याचप्रमाणे काही राजकीय नेत्यांचे नाव जोडले गेले आहेत. त्यावर आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कार्यवाही करणार, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासणीअंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT