Sachin Ahir Latest News Sarkarnama
मुंबई

भाजप-मनसे युतीबाबत अहिरांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

Sachin Ahir : भाजप आणि मनसेला युती करण्याची गजर नाही...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि मनसेची (MNS) चांगलीच जवळीकता वाढली आहे. दरम्यान दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या भेटीही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी मुंबई पालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती होणार का? याबाबत राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा सुरू आहे.

काल (ता.३० ऑगस्ट) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट घेतली. यामुळे युतीबाबत अधिकच चर्चा रंगत आहेत. यावर शिवसेना (Shivsena) नेते आणि आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजप आणि मनसेच्या युतीबाबत गौप्यस्फोट केला आणि आव्हानही दिले आहे.

अहिर म्हणाले की, भाजपा आणि मनसेला युती करण्याची गजरच नाही, कारण त्यांची आधीच छुपी युती झालेली आहे. मात्र त्यांचा सामना करण्याची ताकद शिवसेनेत आहे. मात्र मनसे ज्यांच्यासाठी भोंगा वाजवत होते, त्यांना आता मनसेची गरज लागत नाही. त्यामुळेच भाजप नेते विनोद तावडे, आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या घरी जात असतात,असा गौप्यस्फोट अहिरांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. तसेच गेल्या दोन महिन्यात राज ठाकरे आणि फडणवीसांमधील ही दुसरी भेट आहे. मागील महिन्यात फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तर दोन दिवसांपुर्वी विनोद तावडेंनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. होती. तर काल बावनकुळेंनी घेतलेल्या भेटीने युतीच्या चर्चेला उत आला आहे. मात्र अहिरांनी काहीतरी वेगळत सांगितल्याने राजकीय वर्तूळात चर्चा रंगत आहेत.

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची आक्रमक भूमिका स्वीकारल्यानंतर त्यांची भाजपशी जवळीकता वाढली आहे. तसेच भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबराबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्याचीही पाठराखण त्यांनी केली आहे. यामुळे राज ठाकरे हे खरचं भाजसोबत युती करतील असे बोलले जात आहे. मात्र हिंदी भाषीकांचा त्यांच्यावर रोष असल्याने भाजप युती करण्याचे टाळले, असेही बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT