नाशिक : नाशिक येथील महानुभव पंथाच्या संमेलनात आज (ता.३० ऑगस्ट) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी श्री चक्रधर स्वामींनी मराठी भाषेतील पहिला ग्रंथ लिहिला त्या रिद्धपुरला मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे (NCP)नेते एकनाथ खडसे (Eknath Shinde) भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन हे एकाच मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणावर भाष्य केले असून नवनियुक्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या बारामतीच्या नियोजित दौऱ्यावरही आपली प्रतिक्रिया दिली आहे.(Sharad Pawar-uddhav thackeray-devendra Fadnavis)
नाशिक येथील महानुभव पंथाच्या संमेलनात बोलतांना फडणवीस यांनी श्री चक्रधर स्वामींनी मराठी भाषेतील पहिला ग्रंथ लिहिला त्या रिद्धपुरला मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली.
नाशिकमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभव संमेलनाला त्यांनी आज उपस्थिती लावली होती. याप्रसंगी व्यासपीठावर मंत्री गिरिश महाजन, एकनाथ खडसे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. फडणवीस यावेळी म्हणाले की, रिद्धपुरला मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी २०१४ मध्येच समिती नेमली होती. याबाबात समितीचा अहवालही आला होता. मात्र २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्याने हा विषय मागे पडला, असा टोला देखील त्यांनी आघाडीला यावेळी लगावला. मात्र आता चक्रधर स्वामींच्या अष्ठशताब्दी निमित्ताने या विद्यापीठासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली असून लवकरच बैठक देखील होईल, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नियोजित बारामती दौऱ्याबाबत त्यांना माध्यम प्रतिनिधीने प्रश्न विचारसा असता त्यांनी भाजपचे मिशन बारामती नसून महाराष्ट्र असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये मोठ शाब्दिक युद्ध रंगताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे नवे प्रदेशाध्यक्षांचा पवारांच्या बारामती दौरा जाहीर केला. यामुळे जोरदार चर्चा होत आहे.
बावनकुळे येत्या 6 सप्टेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत.आगामी बारामती लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना करणे हा त्यांच्या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असून या दौऱ्यामध्ये त्यांच्या समवेत पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल, बाळासाहेब गावडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.