Sachin Ahir Eknath Shinde Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Sachin Ahir: एकनाथ शिंदेंकडे जाण्यापूर्वी सचिन अहिरांचा आदित्य ठाकरेंना मेसेज; 2029 मधील वरळी विधानसभा मतदारसंघाचं पिक्चर केला क्लिअर!

Sachin Ahir, Aaditya Thackeray, Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंना मेसेज करून २०२९ मध्ये वरळीतून निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

सरकारनामा ब्यूरो

Shiv Sena UBT: मागील काही दिवसांपूर्वी (२१ जून) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६ खासदारांना शिवसेनेत सामील करून घेतले. ठाकरे या धक्क्यातून सावरतात तोपर्यंत आता एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना अजून एक धक्का दिला आहे. शिंदे यांनी थेट आदित्य ठाकरेंचे जवळचे समजले जाणारे आमदार सचिन अहिर यांनाच विधानपरिषदेच्या उपाध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. अहिर यांनी साथ सोडताना आदित्य ठाकरेंना मेसेज केला होता.

या मेसेजमध्ये अहिर यांनी 2029 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल आदित्य ठाकरेंना आश्वासन दिले आहे. खुद्द आदित्य ठाकरेंनीच याबद्दल सांगितले आहे. ठाकरे म्हणाले, सकाळी त्यांनी मला मेसेज टाकला की 2029 च्या निवडणुकीत वरळीतून उभा राहणार नाही. पण या सर्व म्हणण्याच्या गोष्टी आसतात. महत्वाची गोष्ट हीच आहे, की कोणी कुठूनही उभं राहिलं तरी वरळी बालेकिल्ला आहे.

यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे, जी जबाबदारी देतील ती पूर्ण ताकदीने पार पाडणार असल्याचे सांगितले. मी शिवसेनेतच असून शिंदेंनी जी विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे ती माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा बहुमान आहे, असेही ते म्हणाले.

जेव्हा एकनाथ शिंदेंना विचारलं की, २०२९ मध्ये सचिन अहिर आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवतील का? या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले, हे आत्ताच कशाला? याला वेळ आहे अजून तीन वर्षे बाकी आहेत. मा‍झ्या शेजारी बसलेले सचिन अहिर हे सध्या आमदारच आहेत आणि आता ते उपसभापती म्हणून विधानसभेत बसणार आहेत. आम्ही असं कोणालाही बघून किंवा कुठलाही मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही किंवा कुठलाही निर्णय घेत नाही. त्यामुळं जशी वेळ येईल तसा निर्णय होईल.

वरळीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी अहिर यांच्या जाण्यावर म्हटलं की, नव्या लोकांवर पक्षात किती मोठी जबाबदारी द्यावी? याचं आत्मचिंतन पक्षानं केलं पाहिजे. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "त्यांच्या पक्षाच्या नेत्यानं असं म्हटलंय तर मी तेच सांगतोय की फक्त जाणाऱ्यांना शिव्या देण्यापेक्षा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. शिवसेना आता जाऊन आली सहा मतदारसंघात त्यांचं वेलकम सचिन अहिर यांनी केलं आहे," या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात काढलेल्या दौऱ्यावर भाष्य केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT