

Eknath Shinde on Aaditya Thackeray challenge: सचिन अहिर हे यापूर्वी वरळी मतदारसंघातून आमदार होते. त्यांच्यानंतर २०१४ मध्ये सुनील शिंदे इथले आमदार झाले पण २०१९ ला त्यांनी आदित्य ठाकरेंसाठी हा मतदारसंघ सोडला होता.
त्यामुळं आता पुन्हा एकदा पुढच्या २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात सचिन अहिर असा सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हाच प्रश्न पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारल्यानंतर त्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना विचारलं की, २०२९ मध्ये सचिन अहिर हे अदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवतील का? या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले, हे आत्ताच कशाला? याला वेळ आहे अजून तीन वर्षे बाकी आहेत.
माझ्या शेजारी बसलेले सचिन अहिर हे सध्या आमदारच आहेत आणि आता ते उपसभापती म्हणून विधानसभेत बसणार आहेत. आम्ही असं कोणालाही बघून किंवा कुठलाही मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही किंवा कुठलाही निर्णय घेत नाही. त्यामुळं जशी वेळ येईल तसा निर्णय होईल.
वरळीतील ठाकरे सेनेचे विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी अहिर यांच्या जाण्यावर म्हटलंय की, नव्या लोकांवर पक्षात किती मोठी जबाबदारी द्यावी? याचं आत्मचिंतन पक्षानं केलं पाहिजे. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "त्यांच्या पक्षाच्या नेत्यानं असं म्हटलंय तर मी तेच सांगतोय की फक्त जाणाऱ्यांना शिव्या देण्यापेक्षा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. शिव्यासेना आता जाऊन आली सहा मतदारसंघात त्यांचं वेलकम सचिन अहिर यांनी केलं आहे," अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात काढलेल्या दौऱ्यावर भाष्य केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.