Sadabhau Khot, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Sadabhau Khot News : सदाभाऊंना राग अनावर; मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडीसह शिंदे सरकारवरही बरसले

Maratha Reservation : मराठ्यांना आरक्षण देण्याचे शिंदे-फडणवीस-पवार सरकारला आवाहन

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांकडे बोट दाखवून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. आम्ही आरक्षण दिले होते. मात्र, महाविकास आघाडीत काय झाले माहीत नाही, असे म्हणत न्यायालयाच्या निर्णयाला भाजप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जबाबदार धरत आहे, तर घाईगडबडीत, विचार न करता तत्कालीन भाजप सरकारने आरक्षण दिल्याने ते न्यायालयात टिकले नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मराठा आरक्षणावरून सदाभाऊंनी शिंदे सरकारसह, पूर्वीच्या महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत संताप व्यक्त केला. (Latest Political News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

जालन्यात मनोज जरांगे पाटलांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केल्यानंतर पुन्हा राज्यातील वातावरण तापले. आता उपोषण बंद असले तरी राज्यभर मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलने करत आहे. तसेच महिनाभरात राज्य सरकारकडूनही आरक्षणाबाबत निर्णय घेणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे. यावर विरोधकांनी सरकार वेळकाढूपणा करत असल्याची टीका केली. यावरून महायुतीतील रयत क्रांतीचे नेते माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत चांगलेच संतापले आहेत. (Maharashtra Political News)

ते म्हणाले, 'भाजप सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते, ते न्यायालयात टिकले. पण महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सरकारच्या नाकार्तेपणामुळे आरक्षण टिकले नाही,' असा प्रहार सदाभाऊंनी केला. 'महाविकास काळात मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही? सत्तेच्या काळात तुम्ही गोट्या खेळत होता का? पत्ते पिसायला बसला होता का, असा सवालही सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.

सदाभाऊंनी (Sadabhau Khot) आपल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारवरही निशाणा साधला. 'प्रत्येक जण काखेत जात मारून आंदोलन करायला निघाला आहे. सरकारने आरक्षणासंदर्भात खरी भूमिका मांडावी,' असे म्हणत त्यांनी आरक्षणासंदर्भात सरकारला घरचा आहेर दिला. महायुतीतूनच सरकारला निशाणा केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप काय भूमिका घेणार, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT