India - Canada Dispute: कॅनडा-भारताच्या तणावात आणखी भर ? आता खलिस्तानवादी सुख्खा ठार !

International Political News : सुख्खा हा खलिस्तानी अतिरेकी अर्शदीपसिंग डालाचा उजवा हात
Sukhdool Singh News
Sukhdool Singh NewsSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : खलिस्तानवादी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरच्या खुनाने भारत आणि कॅनडातील तणाव सर्वोच्च पातळीवर गेला, त्यातून दोन्ही देशांनी आपापल्या देशातून एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी नुकतीच केली. दरम्यान, या तणावात काल आणखी भर पडली. सुखदुलसिंग ऊर्फ सुख्खा हा आणखी एक खलिस्तानवादी दहशतवादी कॅनडात बुधवारी रात्री मारला गेला. त्यावरूनही कॅनडा भारताकडेच बोट दाखविण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

सुख्खाला विनपेग शहरात गोळ्या झाडून संपविण्यात आले. २०१७ मध्ये पंजाब येथून कॅनडात बोगस डॉक्यूमेंटच्या आधारे तो पळून गेला होता. तो मूळचा पंजाबातील मोगा गावचा रहिवासी आहे. दहा लाख रुपयांचे इनाम असलेला निज्जरही डुप्लिकेट कागदपत्रे बनवून १९९७ ला कॅनडाला आश्रयाला गेला होता. नुकतेच त्याला तेथील गुरुद्वाराजवळ बुरखाधारी हल्लेखोरांनी गोळ्या झाडून ठार केले. त्यावर त्याची हत्या भारत सरकारने घडवून आणल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला. त्यावरून दोन देशांतील राजनैतिक सबंध चिघळले आहेत. यातच सुखदुलसिंगचाही हत्या झाल्याने ते आणखी बिघण्याची शक्यता आहे.

Sukhdool Singh News
India Vs Canada Dispute: पंतप्रधान मोदींच्या मदतीला काँग्रेस नेता; अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना सुनावले खडेबोल

निज्जर हा मूळचा पंजाबच्या जालंदर जिल्ह्यातील भारसिंहपूर गावचा रहिवाशी होता. देशातील सुरक्षा यंत्रणांनी त्याला फरारी घोषित केले होते. तो कॅनडात बेकायदेशीरपणे राहत असूनही तेथील पंतप्रधानांनी त्याची बाजू घेतली होती. तेथील अस्थिर राजकीय परिस्थिती आणि राजकीय अपरिहार्यतेमुळे ट्रुडोंनी तशी भूमिका घेतली होती. (Maharashtra Political News)

३३८ सदस्यीय कॅनडाच्या पार्लमेंटमध्ये बहुमतासाठी १७० ची गरज आहे. ट्रुडो यांच्या सत्ताधारी पक्षाकडे १५८ सदस्य आहेत. त्यांनी ५६ सदस्य असलेल्या आणि खलिस्तानवादी समर्थक जर्मितसिंग यांच्या न्यू डेमॉक्रॅटिक पार्टीची मदत घेऊन सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे सत्ता राखण्यासाठी ट्रुडो यांना या राजकीय अपरिहार्यतेतून भारताशी पंगा घ्यावा लागला आहे.

सुख्खा हा खलिस्तानी अतिरेकी अर्शदीपसिंग ऊर्फ अर्श डालाचा उजवा हात होता. एनआयएच्या मोस्ट वॉंटेड लिस्टमध्ये तो सामील होता. कॅनडात बसून तो भारतात आपल्या साथीदारांच्या मदतीने खंडणी वसुलीसह इतर गुन्हेही करीत होता. त्याच्याविरुद्ध भारतात सात गुन्हे दाखल आहेत. सुख्खा याला गँगवॉरमधून मारण्यात आले आहे. तरी त्याचे बिल निज्जरप्रमाणे कॅनडाचे पंतप्रधान हे भारतावरच फाडण्याची शक्यता आहे. त्यातून या दोन देशांतील तणाव आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sukhdool Singh News
Women Reservation Bill : महिला आरक्षणाला विरोध करणारे 'ते' दोन खासदार कोण ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com