Sai Resort Case : शिवसेना ठाकरे गटाचे नेत व माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी आरोप केले होते. याबाबत सोमय्या यांनी ईडीकडे तक्रार दाखल केली होती. आज ईडीने परब यांना जोरदार दणका दिला आहे. त्यांची कोट्यवधीची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. यावर आता परब यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल परब म्हणाले, "मी सुरुवातीपासून सांगत होतो की, माझा साई रिसॉर्टशी काहीही संबंध नाही. आज ईडीने जी काही संपत्ती जप्त केली आहे, त्या संपत्तीचे मालक सदानंद परब आहेत.या संपत्तीशी माझा कहीही संबंध नाही. यामागे फक्त माझी बदनामी करण्याचा उद्देश आहे. ज्यावर कारवाई झाली आहे, त्याचे मालक सदानंद परब आहेत. याबाबत तेच योग्य ती कायदेशीर कार्यवाही करतील. "
"किरीट सोमय्या हे काही न्यायाधीश नाहीत. आणि त्या त्यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही. ज्या काही तपास यंत्रणा मला प्रश्न विचारतील , त्यांनाच उत्तर देणे मी बंधनकारक आहे. दोन वर्षापासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी माझी नाहक बदनामी झाली आहे, याची आता न्यायालयात जाऊन मी न्यायाची मागणी करणार," असा इशाराही परब यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.