Saif Ali Khan Attack Updates sarkarnama
मुंबई

Saif Ali Khan Attack Updates Video : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याने केली एक कोटीची मागणी, धक्कादायक माहिती समोर

Saif Ali Khan Attacker Demands 1 Crore : हल्लेखोर घरात घुसला तेव्हा महिलेने त्याला हटकले तसेच घरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या इसमाला महिलेने हटकले आणि तो कशासाठी आला याची विचारणा केली. त्यावेळी हल्लेखोराने महिलेला धमकावले.

Roshan More

Saif Ali Khan Attack Updates : अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. हल्लेखोर हा घरात घुसल्यानंतर त्याने घरात काम करणाऱ्या महिलेशी हुज्जत घातली. त्यानंतर तेथे आलेल्या सैफ अली खान याच्यावर हल्लेखोराने चाकूने वार केले. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हल्लेखोर घरात घुसल्यानंतर तो घरत काम करणाऱ्या महिलेशी बोलत होता. त्या महिलेचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. त्यामध्ये महिलेनी हल्लेखोराने तब्बल एक कोटीची मागणी केल्याची माहिती दिली आहे. जेव्हा हा हल्लेखोर घरात घुसला तेव्हा महिलेने त्याला हटकले तसेच घरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या इसमाला महिलेने हटकले आणि तो कशासाठी आला याची विचारणा केली. त्यावेळी त्याने एक कोटी रुपये हवे असल्याची मागणी केली. तसेच तिच्यावर चाकूने हल्ला केला.

हल्लेखोराने जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत घरातून बाहेर जाणार नसल्याचे महिलेला धमकावले. तेथे सैफ अली खान आला असता हल्लेखोराने त्याच्यावर देखील चाकूने हल्ला. या हल्ल्यात सैफला मानेवर आणि पाठीच्या कण्याजवळ जखम झाली. मणक्याजवळील जखम गंभीर आहे.

सीसीटीव्हमध्ये कैद

फायर एक्झिटसाठी असलेल्या पायऱ्यावरून हल्लेखोर हा सैफ अली खानच्या घरात घुसला तसेच त्या पायऱ्यांनी तो बाहेर गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास घरातून बाहेर पडताना हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याचे छायाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केले असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांची पथके हल्लेखोराला शोधत असून हल्लोखोर हा सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT