
Pune News : सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता पद्मश्री सैफ अली खान यांच्यावर खुनी हल्ला झाल्यानंतर आता सरकारवर जोरदार टीका होत आहे. यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी, महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्यात आल्याची टीका केली आहे. तसेच महायुतीचे सरकार अपयशी, निष्क्रिय ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पद सोडावे, अशी मागणी केली आहे.
मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अनेक सेलिब्रेटींची घरे असून येथे कायदा आणि सुव्यस्थेचा फज्जा उडालेला आहे. काहीच महिन्यांच्या आधी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती. चित्रपट अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. यानंतर आता अभिनेता सैफ अली खान यांच्यावर खुनी हल्ला झाला आहे. यामुळे मुंबईत कोण सुरक्षित आहे? असा सवाल विरोधक सत्ताधाऱ्यांना करत आहेत.
मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढती गुन्हेगारी अनेकांच्या डोकेदुखीचे कारण बनले असतानाच आता चित्रपट अभिनेत्यांना टार्गेट केलं जात आहे. यावरून पटोले यांनी राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच भाजप युती सरकारमध्ये गुंडाराज फोफावले असून सैफ अली खानवरील हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था दिलेले आव्हान असल्याचे पटोले यांनी म्हटलं आहे. महायुती सरकारच्या काळात गुंडाराज फोफावले असून हे सरकारचे अपयश असल्याचा घणाघाती हल्लाबोल देखील पटोले यांनी केला आहे.
भाजप सरकारमध्ये गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या लाडक्या पोलीस महासंचालक अत्यंत निष्क्रीय आहेत. मुंबईला दोन पोलीस आयुक्त आहेत, तरीही ना राज्यात कायदा सुव्यवस्था आहे आणि ना मुंबईत.
बीडमधील संघटीत गुन्हेगारी व त्याला असलेले राजकीय आशिर्वाद, परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू, वांद्र्यात माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार या गंभीर घटना आहेत. गृहमंत्री पद सांभाळण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत. राज्यात सोलिब्रिटी, सत्ताधारी पक्षाचे नेते, सर्वसामान्य जनता कोणीही सुरक्षित नसल्याचे पटोले यांनी यावेळी म्हटले आहे.
गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू अशा विधानांचे पालुपद सोडून काहीतरी कठोर कारवाई करण्याची हिम्मत आता मुख्यमंत्र्यांनी दाखवावी, असे आवाहन पटोले यांनी केले आहे. राज्यात गुन्हेगारी वाढत असताना फडणवीस गंभीर नसल्याचे दिसत आहे. अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. असा निष्क्रीय व कमजोर गृहमंत्री महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.