Sajan Pachpute, Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Sajan Pachpute News : साजन पाचपुते शिवबंधनात ; ठाकरेंनी दिली उपनेतेपदाची जबाबदारी

Amol Jaybhaye

Sajan Pachpute Joins Thackeray Group : भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे, काष्टी गावचे सरपंच साजन पाचपुते यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवबंधन बाधत ठाकरे गटात प्रवेश केला. तालुक्यातील सुमारे एक हजार कार्यकर्ते त्यांच्यासोबत मुंबईत पोहचले होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्यावर उपनेते पदाची जबाबदारी सोपवली आहे.

साजन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात आपली सत्ता पुन्हा आण्यासाठी साजन पक्षात आले आहेत, मला आनंद आहे, साजन हे सहकुटुंब शिवसेनेत आले आहेत. अनेकांच्या पोटात गोळा आला आहे, तो आलाच पाहिजे. राजकारणात अशी पद्धत आहे, की सगळे सत्तेच्या बाजूने जातात. मात्र, साजन हे सत्ता आण्यासाठी आपल्याकडे आले आहेत.

नगर आहेच, पण संपूर्ण राज्यातही फिरावे लागेल. त्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे उपनेतेपद देणार आहे. आपल्याला आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. आपले ठरले होते, प्रवेश झाला की श्रीगोंद्यामध्ये सभा घ्यायची आहे, मी सभेला येणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेत आल्याचा कधीच पश्चताप होणार नाही, असा शब्द देतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळी साजन पाचपुते हे ताफ्यासह मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यापुर्वी काष्टीचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या मंदीरात जावून समर्थकांसह श्रीफळ अर्पण केले. त्यावेळी गावातील लोकांनी उत्सुर्तपणे त्यांना या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. मुंबईकडे रवाना होण्यासाठी सर्व वाहने एकत्रीत करुन साजन पाचपुते यांनी काष्टीत मोठे शक्ती प्रदर्शन केले. साजन यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री सुनंदाकाकी, पत्नी अनुजा याही उपस्थित होत्या. शिवसेनेचे जेष्ठनेते भाऊसाहेब गोरे, तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे हेही यावेळी सोबत होते.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT