Pankaja Munde On Ajitdada : अजितदादांना भाजपने सत्तेत का घेतले? पंकजा मुंडेंनी सांगितले कारण...

Maharashtra politics : युद्धात आणि राजकारणात काही तरी गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी या गोष्टी लोक करतात.
Pankaja Munde-Ajit Pawar
Pankaja Munde-Ajit PawarSarkarnama

Chhatrapati Sambhaji Nagar News : एकनाथ शिंदे यांना सोबत घेणं, ही भारतीय जनता पक्षाची गरज होती. कारण, भाजपला सत्तेत यायचं होतं. पण, भाजप सत्तेत आल्यानंतर अजित पवार आले. त्याच्याबद्दल काय तर केंद्रीय पातळीवर असा अजेंडा आहे की, लोकसभा निवडणुकीत विरोधकच नसला पाहिजे. त्यामुळेच अजित पवारांना सोबत घेण्याचा प्रयत्न असावा, असे भारतीय जनता पक्षाच्या सचिव पंकजा मुंडे यांनी सांगितले. (Why did BJP take Ajit Dada along? Pankaja Munde told Reason...)

माजी मंत्री पंकजा मुंडे या सध्या शिवशक्ती परिक्रमा करत आहेत. त्यादरम्यान त्यांनी अजित पवारांना भाजपने सोबत घेण्याचे कारण सांगून टाकले. त्या म्हणाल्या की, विरोधक कमकुवत व्हावा, असा प्रयत्न भाजपकडून करण्यात आलेला असावा. पुढे काय होणार, हे मात्र मी सांगू शकत नाही.

Pankaja Munde-Ajit Pawar
Marathwada Marathas Are Kunbi : मराठवाड्यातील मराठा हा कुणबीच; धाराशिवच्या जिल्ह्याधिकाऱ्यांचा सरकारला शंभर पानी अहवाल सादर

अनेक जण पिढ्यानपिढ्या वेगवेगळ्या पक्षाशी जोडलेले असतात. ते आता बोलतात की आम्ही आमच्या पक्षाशी आणि नेत्यांशी प्रामाणिक राहिलो, पण ते आमच्याशी तसं राहिले नाहीत. युद्धात आणि राजकारणात काही तरी गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी या गोष्टी लोक करतात. त्याचे परिणाम राज्याला आणि राज्यातील जनतेला काय वाटतात, ते काळच ठरवेल, असे उत्तर पंकजा यांनी मतदारांशी प्रतारणा झाली आहे का, या प्रश्नावर दिले.

Pankaja Munde-Ajit Pawar
Sharad Pawar NCP Meeting: शरद पवार ‘इलेक्शन मोड’वर; राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची बोलावली महत्वपूर्ण बैठक

पंकजा मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्र हे वेगळे राज्य आहे. भाजपने राज्यात कायम युतीमध्ये काम केलेले आहे. काही ठिकाणी पक्ष बांधलाच गेलेला नाही. युतीमध्ये काम करत असताना तणाव असल्याने काही जागांवर नक्कीच परिणाम झालेला असेल. सरकारने चांगलं केलेले आहे. पण लोकांनी आम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात स्वीकारलेलं नाही, हेही खरं आहे. महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे, इथं कायम नेत्याभोवती राजकारण चालत आलेलं आहे. त्यात मुंडे, पवार, ठाकरे हे नेते आणि त्यांना जोडलेले असंख्य मतदार हे फॉलोअर्स कम मतदार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अजून पुढच्या काळात काय होईल, हे सांगता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com