Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Sakal-Saam Maha Survey : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत; 'सकाळ-साम'च्या सर्व्हेक्षणातील 42 टक्के लोकांची भावना

Sakal-Saam Mahasurvekshan : विरोधकांतून सर्वात जास्त राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून पसंती

सरकारनामा ब्यूरो

Do you want Narendra Modi to be Prime Minister again? : देशात २६ मे २०१४ रोजी 'एनडीए'चे सरकार स्थापन झाले. त्यानंतर २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकून पुन्हा केंद्रात भाजप मित्र पक्षांचे सरकार स्थापन झाले. या भाजपप्रणीत केंद्र सरकारला २६ मे २०२३ रोजी नऊ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर 'सकाळ-साम'तर्फे महासर्व्हेक्षण करण्यात आला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे असे वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. या प्रश्नावर सहभागी लोकांनी मोठा प्रतिसाद दिला.

'सकाळ-साम' महासर्व्हेक्षणात सुमारे ४९ हजार २३१ लोकांनी सहभाग घेतला आहे. यात राज्यातील २८८ विधानसभा, ४८ लोकसभेच्या मतदारसंघातील लोकांचा समावेश केला आहे. या लोकांमध्ये पिवळे शिधापत्र, केशरी शिधापत्र, अल्पउत्पन्न, माध्यमवर्ग , श्रीमंत अशा आर्थिक स्तरातील लोक सहभागी झालेले आहेत. या सर्व्हेक्षणात सर्व जाती, धर्मातील लोकांनीही सहभाग घेतला आहे. त्यामुळे या 'सकाळ-साम' महासर्व्हेक्षणाला महत्व आहे. दरम्यान, या सर्व्हेक्षणासाठी सकाळ समुहातील सुमारे दोन हजार लोकांनी परिश्रम घेतले. (Sakal Survey on Narendra Modi Government Nine years)

या महासर्व्हेक्षणातील नऊ वर्षानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा पंतप्रधान व्हावे असे वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला हो, नाही आणि सांगता येत नाही असे पर्याय दिले होते. त्यास सहभागी लोकांनी उत्तर दिले आहे. त्यांच्या उत्तरानुसार तब्बल ४२.१ टक्के लोकांनी 'हो' असे उत्तर दिले आहे. म्हणजे सुमारे ४२ टक्के लोकांना मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, असे वाटत आहे. या प्रश्नाला उत्तर देताना ४१.५ टक्के लोकांनी 'नाही' असे उत्तर दिले आहे. तर १६.४ टक्के सहभागी लोकांनी 'सांगता येत नाही' असे सांगितले आहे.

या महासर्व्हेक्षणातून विरोधकांतील कोणत्या नेत्याला पंतप्रधान म्हणून प्रधान्य द्याल, असेही विचारण्यात आले. या प्रश्नाला सर्वाधिक ३४.९ टक्के लोकांची पसंती राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मिळाली आहे. राहुल यांच्यानंतर लोकांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) १२ टक्के, ममता बॅनर्जी ४.५ , नितीश कुमार ४.१, केसीआर २.९ , एम. के. स्टॅलीन १.८ टक्के अशी पसंती दिली आहे. सहभागी २३.२ टक्के लोकांनी 'यापैकी एकही नाही' असे उत्तर दिले आहे. तर १६.७ टक्के लोकांनी 'सांगता येत नाही' असे म्हटले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT