Sambhaji Raje Chhatrapati sarkarnama
मुंबई

राज्यसभेची निवडणूक अपक्षच लढण्यावर संभाजीराजे ठाम!

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) राज्यसभेची निवडणूक अपक्षच लढण्यावर ठाम असल्याचे वरिष्ट सूत्रांकडून कळते आहे. संभाजीराजे यांना शिवसेनेच्या तिकीटावर राज्यसभेची निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता, अपक्ष निवडणूक लढवण्यावर ते ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी वेगाने घडामोडी घडत आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष म्हणून राज्यसभेची जागा लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, सहावी जागा शिवसेना (Shivsena) लढविणार असल्याने संभाजीराजे यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची 'वर्षा' या निवासस्थानी भेट घेतली होती. यात उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंपुढे शिवसेनेत येण्याची आणि शिवसेनेचा प्रचार करण्याची ऑफर दिल्याची माहिती होती.

या चर्चेदरम्यान शिवसेनेने संभाजीराजे यांना राज्यसभेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, संभाजीराजे यांनी माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने आणि महाविकास आघाडी पुरस्कृत म्हणून जाहीर करावी, असा प्रस्ताव उद्धव ठाकरेंना दिला. त्यावर ठाकरे यांनी संभाजीराजेंना ४ अटी घातल्या. मात्र, या अटींचा तपशील ऐकताच ते नाराज झाले. या अटींमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्थाव संभाजीराजेंनी दिला असे सांगितले जात आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे हे आमचे आहेत. त्यांचे आमचे चांगले संबंध आहे. निवडणूक लढायची असेल तर, तुम्ही शिवसेनेत या, अशी आम्ही त्यांना विनंती केली, असल्याचे राऊत यांनी सांगितले होते. याबाबत आता मुख्यमंत्री निर्णय घेतील. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. सहावी जागा शिवसेनेची असून, आम्हाला पक्षाची जागा वाढवायची आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने जागा लढवली होती. शिवसेना पक्षाचाच उमेदवार देण्यावर ठाम, असल्याचेही राऊत म्हणाले होते. मात्र, शिवसेनेच्या या प्रस्थावानंतरही संभाजीराजे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यसभेच्या ६ पैकी ५ जागांवर भाजपचे २, शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा प्रत्येकी १ खासदार निवडून येवू शकतो. त्यामुळे उर्वरित सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतून सहावी जागा शिवसेना लढविणार असल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT