Sameer Wankhede Extortion case : Sarkarnama
मुंबई

Sameer Wankhede Extortion Case : समीर वानखेडे भ्रष्टाचार प्रकरण ; याचिकेवरील सुनावणी ५ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधातील भ्रष्टाचार प्रकरणात 'सीबीआय'ने दाखल केलेला खंडणीचा गुन्हा, रद्द करण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे. दरम्यान, या याचिकेवरील सुनावणी ५ सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली आहे. या याचिकेवरील सुनावणी ५ सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली असली तरी, यामध्ये कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

समीर वानखडे यांनी त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रकरणी 'सीबीआय'ने दाखल केलेला खंडणीचा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी सीबीआय तर्फे महाधिवक्ता तुषार मेहता बाजू मांडणार आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करताना गृह खात्याची मंजुरी घेण्यात आली मात्र, समीर वानखेडे हे 'आयआरएस' अधिकारी असून ते अर्थ खात्याच्या अखत्यारीत येतात. ते महसुल खात्याचे अधिकारी आहेत पोलीस अधिकारी नाहीत, असेही या याचिकेतून स्पष्ट करण्यात आले आहे.

२०२० मध्ये त्यांची एनसीबीमध्ये अल्पमुदतीसाठी नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांचा पगार अर्थ खातच देत होते. तसेच त्यांच्या बदली संदर्भातील सगळे निर्णय देखील अर्थ खात्याच्याच आदेशाने झाले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात खटला चालविता येणार नसल्याचेही समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या याचिकेवरील सुनावणी ५ सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली असली तरी, यामध्ये कोर्ट काय निर्णय घेणार याकडे लक्ष सर्वांचे असणार आहे.

आर्यन खान प्रकरण

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेमुळे ते वादात सापडले होते. या प्रकरणामुळे चर्चेत आलेले 'आयआरएस' अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआयने हा गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांच्या संबंधित सात ठिकाणी 'सीबीआय'ने छापेमारी केल्याची माहिती आहे. आता त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.'सीबीआय'ने 'आयआरएस' अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह इतरांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करून त्यांच्या मुंबईतील घराची झडती घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. वानखेडे हे यापूर्वी 'एनसीबी' मुंबई झोनचे प्रमुख होते. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेमुळे ते वादात सापडले होते.

SCROLL FOR NEXT