Sanjay Raut-Loksabha Election : ठाकरे गटात हालचाली सुरू; संजय राऊत ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवणार ?

Uddhav Thackeray Group : राऊत यांनी निवडणूक लढवल्यास संजय राऊत यांची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असेल.
Sanjay Raut on Loksabha :
Sanjay Raut on Loksabha : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. ठाकरे गटाकडून नुकतीच सर्वच लोकसभा मतदार संघाचा आढावा बैठक घेतल्यानंतर मातब्बर नेत्यांची वाणवा जाणवत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाणार असल्याचे सांगितलं जात आहे.

या बाबत संजय राऊत यांनी सध्या निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला नसला तरी पक्षाने सांगितले तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. राऊत यांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवल्यास त्यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असेल असं सांगितलं जात आहे. ईशान्य मुंबईतून भाजपचे मनोज कोटक खासदार आहेत.

Sanjay Raut on Loksabha :
Vijaykumar Gavit on Aishwarya Rai: ऐश्वर्या राय मासे खायची म्हणून तिचे डोळे सुंदर झाले; गावितांचे वादग्रस्त विधान

आढावा बैठकीनंतर ठाकरे गटाचे नेते, राज्यसभेतील सदस्य संजय राऊत हे लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा आहे. संजय राऊत हे मुंबईतील ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे.

त्यासाठी महाविकास आघाडीत जोरदार हालचाली सुरू झाल्या असल्याचं सांगितलं जात आहे. संजय राऊत हे राज्यसभेवर चार वेळा निवडून आले आहेत. ठाकरे गटाकडून त्यांना ईशान्य मुंबईतून तिकीट देण्याचं घटत आहे. त्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राऊत यांनी निवडणूक लढवल्यास संजय राऊत यांची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असेल.

Sanjay Raut on Loksabha :
I.N.D.I.A. Mumbai Meeting : मुंबईत 'इंडिया'च्या 'लोगो'चे अनावरण; 'हे' नेते ठरवणार लोकसभेची रणनीती

लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईत भाजपचे मनोज कोटक विरुद्ध संजय राऊत असा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. इंडिया आघाडीने देशभरात एकास एक उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीचा हा फॉर्म्युला सर्वच घटक पक्षांना बंधनकारक असणार आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com