Vijaykumar Gavit on Aishwarya Rai: ऐश्वर्या राय मासे खायची म्हणून तिचे डोळे सुंदर झाले; गावितांचे वादग्रस्त विधान

Vijaykumar Gavit Controversial Statement: शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनीही दोन दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केलं होतं.
Aishwarya Rai - Vijaykumar Gavit
Aishwarya Rai - Vijaykumar Gavit Sarkarnama
Published on
Updated on

Dhule Political News

शिंदे गटाच्या आमदारांना कसं मंत्रिपद मिळालं याबाबत गौप्यस्फोट करून आमदार भरत गोगावले यांनी शिंदे सरकारला अडचणीत टाकलं होतं. त्याला काही तास उलटत नाहीत, तर आता राज्याचे आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

धुळे जिल्ह्यातील अंतुर्ली येथे आदिवासी मच्छीमार बांधवांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. गावित म्हणाले, मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. मासे खाल्ले की बाईमाणूस चिकणी दिसायला लागतात. डोळेपण तरतरीत दिसतात. कुणी बघितलं तर लगेच पटवून घेणार. त्वचाही चांगली दिसू लागते. माश्यात एक प्रकारचं तेल असतं. त्या तेलाचा डोळ्यांवर चांगला परिणाम होतो. माशाच्या तेलामुळे शरीराची त्वचाही चांगली होते. असंही गावित यांनी नमूद केलं.

Aishwarya Rai - Vijaykumar Gavit
I.N.D.I.A. Mumbai Meeting : मुंबईत 'इंडिया'च्या 'लोगो'चे अनावरण; 'हे' नेते ठरवणार लोकसभेची रणनीती

विजयकुमार गावित म्हणाले, "ऐश्वर्या राय बंगळुरूच्या समुद्रकिनारी शहरात राहायची. ती दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही मासे खाल्ले तर तुमचेही डोळे ऐश्वर्या रायच्या डोळ्यांसारखे सुंदर होतील, त्वचाही सुधारेल. मासे खाल्ल्यावर दोन फायदे आहेत. मासे खाल्ल्यावर माणूस.. माणूस म्हणजे बाईमाणूस चिकणे दिसायला लागतात आणि डोळे तरतरीत दिसतात. कुणीही बघितली तरी पटवूनच घ्या. तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना… ती दररोज मासे खायची, म्हणून तिचे डोळे सुंदर झाले. माशात ऑईल असतं. माशाचे तेल डोळे आणि परिणाम होतो. त्यामुळे त्वचाही चांगली राहते, असंही ते म्हणाले. (Dhule News)

Aishwarya Rai - Vijaykumar Gavit
Minister Dhananjay Munde : बीडमधील सभा कुणाला उत्तर देण्यासाठी नाही..

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच आमदार भरत गोगावलेंनी असेच एक वादग्रस्त विधान केले होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आमच्या गटातील काही आमदारांनी त्यांच्यावर दबाव टाकून मंत्रिपदे मागून घेतली होती. त्यातल्या एकाने तर थेट मला मंत्रिपद दिले नाही, तर माझी बायको आत्महत्या करेल, अशी धमकीच दिल्याचं गोगावले म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे मोठा वादही निर्माण झाला.  

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com