Sameer Wankhede Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

Will Sameer Wankhede Arrest: समीर वानखेडेंना अटक होणार?

Sameer Wankhede News: न्यायालयाने वानखेडेंना 24 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं.

सरकारनामा ब्यूरो

Sameer Wankhede Will be Arrested: न्यायालयाने वानखेडेंना 24 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं. तसेच, तसेच, २२ मे पर्यंत वानखेडे यांना सीबीआयला आपले म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. ही मुदत आज संपत आहे. त्यामुळे वानखेडेंना आज अटक होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तसेच, 'सीबीआय'ला चौकशीला सहकार्य करण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यानंतर शनिवारी (२० मे) पाच तास आणि रविवारी (२१ मे) पुन्हा तब्बल तीन तास चौकशी करण्यात आली. समीर वानखेडे यांनी या प्रकरणाची चौकशी करत असताना न्यायालयात सादर केलेल्या चॅट अगोदर का दाखवल्या नाहीत? 'सीबीआय'ने गुन्हा दाखल केल्यानंतर आपल्या फेव्हरमधील चॅट वानखेडे यांनी कशा बाहेर काढल्या? जेव्हा समीर वानखडे यांना खाजगी व्यक्ती के.पी.गोसावी यांच्यासंदर्भात विचारले तर त्याचं उत्तर का देत नाहीत?

वानखेडे यांनी के.पी.गोसावी याच्यावर क्रिमिनल रेकॉर्ड असूनही त्याला तपासात सहभागी का केलं? याचे उत्तर त्यांनी का दिलं नाही?, अशा अनेक प्रश्नाचे उत्तर समीर वानखडे यांनी दिलेले नाही. असा दावा सीबीआय कडून केला जात आहे.तर दुसरीकडे, खोटे पुरावे सादर करून सीबीआय तपासाला चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा वानखेडे यांच्याकडून केला जात आहे.

दरम्यान, समीर वानखेडेंनी आज मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. वानखेडेंनी आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा करत सुरक्षेची मागणी केली आहे. गँगस्टर आतिक अहमदसारखी माझीही परिस्थिती होईल, असा दावा करत त्यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. असे असतानाच एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांना धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT