मुंबई : अंमली पदार्थ प्रतिबंधक (एनसीबी) मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांनी जोरदार टीका करत तुझी नोकरी वर्षभरात जाईल. तुझा तुरुंगावास पाहिल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता राहणार नाही, असा इशारा दिला होता. त्यांतर आता समीर वानखेडे लवकरच मलिक यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती आहे.
वानखेडे म्हणाले, नवाब मलिक यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. सेवेत रुजू झाल्यापासून मी कधीच दुबईला गेलो नाही. मी माझ्या बहिणीसह मालदीवला गेलो नाही. मी सरकारकडून अधिकृत रजा घेतली आणि माझ्या स्वतःच्या पैशाने माझ्या कुटुंबासह सहलीला गेलो होतो. माझी बहीण स्वतंत्रपणे मालदीवला गेली होती. मलिक वारंवार माझ्या कुटुंबातील महिलांना लक्ष्य करत आहे, हीबाब चुकीची आहे आणि यासाठी मी लवकरच न्यायालयात दाद मागणार आहे. कायदेशीर मार्ग अवलंबणार, असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.
भाजपचे लोक लोकांवर दहशत निर्माण करून वसुली करत आहेत. समीर वानखेडे हा बोगस, ह्याचा बाप बोगस, ह्याच्या घरातील लोक बोगस आहेत. तुझे बाप कितीही दबाव टाकत असतील, पण हा नवाब मलिक तुझ्या बापाला घाबरणार नाही, अशा शब्दांत मलिक यांनी वानखेडेंवर निशाणा साधला होता. समीर वानखेडे प्रसिद्धसाठी लोकांना अडकवण्याचे काम करत आहे. हा वानखेडे भाजपवाल्यांचा म्होरक्या आहे. तो बोगसगिरी करतो, त्यामुळेच एनसीबी सध्या करत असलेल्या केसेस या बोगस आहेत. ह्या सर्व केसेस कोर्टात टिकणार नाहीत. आगामी काळात मी आणखी पुरावे सादर करणार आहे. या संदर्भात चालणारे तोडपाणी हे मालदीव आणि दुबईत चालते आहे, हे आम्हाला समजलंय, ही तोडपाणी थांबण्याचे काम मी करणार आहे, असे नवाब मलिक म्हणाले होते.
भाजपचे लोक ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आदी संस्थांच्या माध्यमातून लोकांना भीती दाखवण्याचे काम करत आहेत. पण हा नवाब मलिक कुणाच्या बापाला भिणारा नाही. फडणवीस म्हणतात की राज्याचे अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात जाईल, माझे तर त्यांना आव्हान आहे की, त्यांनी आम्हाला तुरुंगात टाकावेच, असे आव्हानही मलिक यांनी फडणवीस यांना दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.