गडकरींनी वडेट्टीवारांना झापले ; फडणवीस मला धाकट्या भावासारखे

नितीन गडकरी (bjp Nitin Gadkari) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चांगलीच जिरवल्याची टीका वड्डेटीवार यांनी केली
Nitin Gadkari, Vijay Vadettiwar
Nitin Gadkari, Vijay Vadettiwarsarkarnama
Published on
Updated on

नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांची देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीच्यानिमित्ताने जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (bjp Nitin Gadkari) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चांगलीच जिरवल्याची टीका वड्डेटीवार यांनी केली. नागपूरच्या या दोन्ही नेत्यांमध्ये छत्तीसचा आकडा आहे, हे सांगायला देखील ते विसरले नाहीत. वडेट्टीवारांच्या (Vijay Vadettiwar) या विधानाला गडकरींनी प्रत्युत्तर दिलं आहे.

''विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आपण महाराष्ट्राचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना मी कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही. वडेट्टीवारांनी तशी वक्तव्ये करून बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये,'' असा टोला केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे.

''फडणवीस यांच्या विरोधात गडकरी यांनी आपल्याला गुपचूप काही तरी सांगितले,'' असे जे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे. फडणवीस माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांच्या विरोधात काड्या करणे आणि एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहतात, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

Nitin Gadkari, Vijay Vadettiwar
मोठी बातमी : एकनाथ खडसेंना न्यायालयाकडून दिलासा

फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्राची प्रगती झाली. विरोधी पक्ष नेते म्हणूनही ते उत्तम काम करीत आहेत. महाविकास आघाडीच्या चुकांवर नेमके बोट ठेवून ते लोकशाहीतील विरोधकांचे कर्तव्य निभावत आहेत. सरकार तीन पक्षांचे असले तरी काँग्रेसमध्ये नैराश्य आहे. त्यांना कुणीही मोजत नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसी नेते अशा प्रकारची वक्तव्ये करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही गडकरी यांनी केला आहे.

प्रचारसभेत वड्डेटीवार म्हणाले होते की, गडकरी आणि फडणवीस यांच्यात जमत नाही. दोघांमध्ये ३६चा आकडा आहे. गडकरींनी फडणवीसांची चांगलीच जिरवल्याचे मला कानात सांगितले आहे. आता आणखी जिरवणार असल्याचा दावाही वड्डेटीवार यांनी केला. नागपूरवाल्यांना फडणवीस आणि गडकरी यांच्यातील संबंध चांगले माहित आहे. त्यामुळे आपला विजय या निवडणुकीत निश्चित आहे.

वडेट्टीवार कुठल्या बिळात जाऊन बसलेत ; OBCनिधीवरुन पडळकरांचा हल्लाबोल

मुंबई : : काँग्रेस नेते आणि मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. वडेट्टीवार हे ओबीसी (OBC) व भटके विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेला आपली जहागिर समजून मनमानी कारभार करतायेत. महाज्योती संस्थेचा बट्ट्याबोळ व हसं या या प्रस्थापितांच्या सरकारनं करून ठेवलं आहे, असा आरोप गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) केला आहे. ''बड्या बड्या बाता आणि 'धोरण' खातंय लाथा,'' अशी वडेट्टीवरांची गत झालीये. ओबीसी भटक्या विमुक्तांचा पुळका आल्याच दाखवायचं आणि परत त्यांच्याच गळ्यावर सुरा फिरवायचा हे वडेट्टीवार यांचे धोरण असल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com