Sangram Patil: भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आणि वैद्यकीय डॉक्टर, लेखक तसंच युट्बुबर असलेले डॉ. संग्राम पाटील यांच्या चौकशी प्रकरणी एक महत्वाची घडामोड घडली आहे. मुंबई हायकोर्टानं पोलिसांना नोटीस बजावली असून सरकारकडंही उत्तर मागितलं आहे. उत्तर आल्यानंतर पुढील सुनावणी ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मोदी सरकारवर कठोर टीका केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
जळगाव जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाकडं जाण्यासाठी निघालेले त्यासाठी डॉ. संग्राम पाटील हे आपल्या कुटुंबियांसह १० जानेवारीला मुंबईत विमानतळावर दाखल होताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. संग्राम पाटील भारतात येणार असल्याचं कळताच भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानं त्यांच्याविरोधात पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला होता. भाजपच्या हायकमांडवर टीका करुन भावना भडकवल्याचा आरोप त्यांनी केला होता.
आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा तसंच लूक आऊट सर्क्युलर रद्द करावी यासाठी डॉ. संग्राम पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. कारण संग्राम पाटील हे भारताचे नव्हे तर ब्रिटिश नागरिक असल्यानं आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्यांच्यावर अशी कारवाई करता येत नाही. त्यामुळं या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी झाली तेव्हा संग्राम पाटील हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचा युक्तीवाद केला. तर संग्राम पाटील यांच्या वकिलांनी युक्तीवाद करताना पाटील यांच्याविरोधातील कारवाई बेकायदा असल्याचं म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.