BMC MIM News : एमआयएमची मोठी खेळी! मुंबई महापालिकेत गटनेतेपदी बिगर मुस्लिम नगरसेवकाची केली नियुक्ती

BMC MIM News : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मालेगाव इथून केली घोषणा
Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleel
Published on
Updated on

BMC MIM News : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून महापौरपदांची आरक्षण सोडतही जाहीर झाली आहे. येत्या काळात महापौरपदासाठी निवडणूक पार पडून महापौरपदी कोण विराजमान होणार हे देखील निश्चित होईल. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या गटनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या जात आहेत. यामध्ये एमआयएमनं मोठी खेळी केली आहे. या पक्षानं मुंबई महापालिकेसाठी आपल्या गटनेतेपदी एका बिगर मुस्लिम नगरसेवकाची नियुक्ती केली आहे. एमआयएमचं राजकारण हे मुस्लिम केंद्रीत राजकारण असल्याचा आरोप होत असताना पक्षानं हा मोठा निर्णय घेतला आहे.

Imtiaz Jaleel
महापौरपदाच्या चक्राकार आरक्षण सोडतीचा नियम काय? कशी असते प्रक्रिया?

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ही घोषणा केली आहे. मालेगाव इथून बोलताना जलील यांनी सांगितलं की, "विजय तातोबा उबाळे हे आमच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन या पक्षाचे मुंबई महानगरपालिकेचे गटनेते असतील. उबाळे हे हिंदू समाजातून आलेला एक तरुण असून हे मुलांना शिकवण्याचं काम करतात, क्लासेस घेतात. जर तुम्ही यांची जीवनकहानी पाहिलीत तर कशा पद्धतीनं निवडणूक लढले होते तर लोकांनी त्यांना निवडणूक लढायला सांगितलं. लोकांनी पैसा जमा करुन त्यांचा निवडणुकीचा खर्च भागवून त्यांना निवडून आणलं आहे. त्यामुळं सर्वाच्या तोंडावर आम्ही एक चपराक दिली आहे. कारण जेव्हा सहर शेखच्या विधानावरुन लोक म्हणताहेत की ते तर मुसलमानांचीच चर्चा करत असतात. आता आम्ही वाट पाहतोय की दुसरे पक्ष आमची कधी काळजी घेतील"

Imtiaz Jaleel
Mayor Reservation: महापौरपद आरक्षण सोडतीवरून मोठा वाद! ठाकरे सेनेचा आक्षेप, काँग्रेसचा खळबळजनक आरोप

दरम्यान, एमआयएमचे मुंबई महापालिकेत एकूण ८ नगरसेवक निवडून आले आहेत. मनसेला देखील ही किमया साधता आली नाही, त्यांचे केवळ ६ नगरसेवक निवडून आले आहेत. तर सर्वाधिक ८९ नगरसेवक भाजपचे, २९ नगरसेवक शिवसेनेचे, ६५ नगरसेवक ठाकरे सेनेचे तर काँग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले आहेत. पण एमआयएमनं या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातच घवघवीत यश मिळवलं आहे. त्यामुळं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा देखील उत्साह दुणावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com