Dr. Sangram Patil 
मुंबई

Sangram Patil: मोदी सरकारला नडलेल्या डॉ. संग्राम पाटील यांना अटक! लंडनहून मुंबईत येताच एअरपोर्टवरून घेतलं ताब्यात

लंडनहून मुंबई एरपोर्टवर उतरताच पोलिसांनी तातडीनं घेतलं ताब्यात

Amit Ujagare

Sangram Patil: लंडनवासी असलेले अनिवासी भारतीय आणि वैद्यकीय डॉक्टर, लेखक, कार्यकर्ते असलेले डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी विमानतळावरुन ताब्यात घेतलं आहे. कोविड काळात या महामारीशी लढण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून ते सातत्यानं वैद्यकीय मार्गदर्शन करत असत त्यामुळं ते चर्चेत आले होते. मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असिम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याची माहिती दिली आहे. मोदी सरकारवर सातत्यानं टीकात्मक भूमिका घेत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याची चर्चा सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

असिम सरोदे यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईत उतरताच पोलिसांनी एअरपोर्टवर ताब्यात घेतले. आत्ताच (साधारण दुपारी ३ वाजता) त्यांच्याशी संपर्क झाला असून त्यांना व त्यांच्या पत्नीला पहाटे 2 वाजल्यापासून पोलिसांनी चौकशीच्या निमित्तानं ताब्यात ठेवलेलं आहे. खरं तर हे अन्याकारक आणि छळवादी आहे.

संग्राम पाटील हे लंडनमध्ये राहतात. सातत्याने सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. एक उत्तम भारतीय जे आता लंडनवासी आहेत त्यांच्यामध्ये डॉ. संग्राम पाटील यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी लंडनमध्ये माझं भाषणही आयोजित केलं होतं. पोलीस त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचा बॉण्ड लिहून घेऊन त्यांना अटी आणि शर्ती घालून सोडतील असं दिसतंय.

मी त्यांच्या संपर्कात आहे आणि संग्राम पाटील यांना कोणतीही कायदेशीर मदत लागल्यास तशी पावले उचलण्यात येतील. पण पोलिसांनी अन्यायकारक कारवाई करू नये, कोणत्याही राजकीय व्यक्तीला पोलिसांनी स्वतःचा गैरवापर करू देऊ नये. आशा करूया की संग्राम पाटील यांना अटक करण्यात येणार नाही, असंही असिम सरोदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, डॉ. संग्राम पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळताच पुरोगामी वर्तुळातून सोशल मीडियावर या कारवाईविरोधात पोस्ट पडायला लागल्या आहेत. सार्वजनिक जीवनातील अनेक मान्यवरांनी फेसबकू-ट्विटर पोस्टव्दारे सरकारच्या या कृतीचा निषेध नोंदवला आहे. "भारतात लोकशाही जिवंत आहे का?" असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर येता क्षणीच अटक केली याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. सडेतोड राजकीय भूमिका घेणाऱ्या डॉ संग्राम पाटलांना केलेली अटक ही आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नाचक्की करणारी आहे. नेमकी काय कारणामुळे अटक केली याचा मुंबई पोलीस आणि गृह मंत्रालयाने तातडीने खुलासा करावा. या दडपशाहीचा आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून धिक्कार करतो" असंही सपकाळ यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT