Sanjay Nirupam sarkarnama
मुंबई

Sanjay Nirupam Suspension: मोठी बातमी! काँग्रेस पक्षाचा संजय निरुपम यांना दणका, सहा वर्षांसाठी निलंबन

Congress Political News : काँग्रेसने निरुपम यांना पहिला झटका देताना महाराष्ट्र स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवण्यात आले होते.

Deepak Kulkarni

Mumbai News : मुंबईतील काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam News) यांना पक्षाने झटका दिला आहे.मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते.पण हा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नेत्यांना जोरदार टीका केली होती.

यानंतर काँग्रेसने निरुपम यांना पहिला झटका देताना महाराष्ट्र स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवण्यात आले आहे.त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईही करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.अखेर निरुपम यांचं काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे.

काँग्रेस नेते संजय निरुपम आपल्याच पक्षावर उघडपणे टीका करत आहेत.त्यांच्या भूमिकेनंतर पक्षातील नेत्यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला.बुधवारी झालेल्या प्रचार समितीच्या बैठकीत त्यांना स्टार प्रचारकाच्या यादीतून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.निरुपम यांना थेट पक्षातून हकालपट्टी करण्याचे संकेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिले होते. त्याप्रमाणे आता काँग्रेस पक्षाकडून निरुपम यांचं पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहेत.

शिवसेनेने उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून लढण्यासाठी निरुपम इच्छुक होते. कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निरुपम यांनी मीडियाशी बोलताना कीर्तिकरांसह काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली होती. त्यांनी पक्षाला अल्टिमेटमही दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय निरुपम यांच्या ट्विटमधून ते काँग्रेस (Congress) सोडणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे ते महायुतीमधील कोणत्या पक्षात जाणार याची उत्सुकता आहे. ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खिचडी चोरांचा प्रचार आपण करणार नाही, असे म्हणत थेट महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतली होती.

पटोलेंना प्रत्युत्तर...

संजय निरुपम (Sanjay Nirupam ) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाने माझ्यासाठी जास्त उर्जा आणि स्टेशनरी वाया घालवू नये. त्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या खुर्च्या आणि उर्जेचा उपयोग पक्ष वाचवण्यासाठी करावा. अगोदरच काँग्रेस पक्ष भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मी काँग्रेस पक्षाला एक आठवड्याचा वेळ दिला होता, तो आज पूर्ण होत आहे. उद्या मी स्वत: निर्णय जाहीर करेन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT