Sanjay Nirupam News : संजय निरुपम यांच्या 'अ‍ॅक्शन' आधीच काँग्रेसचा 'जोर का झटका'

Congress News : काँग्रसचे नेते संजय निरुपम यांच्याकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने पक्षातील नेत्यांवर टीका केली जात आहे. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला गेल्याने ते नाराज आहेत.
Sanjay Nirupam
Sanjay NirupamSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईतील काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam News) यांना पक्षाने झटका दिला आहे. मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते. पण हा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नेत्यांना जोरदार टीका केली. ते काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. त्यातच त्यांच्या नावाचा समावेश पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही होता.

संजय निरुपमांच्या भूमिकेनंतर पक्षातील नेत्यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. आज झालेल्या प्रचार समितीच्या बैठकीत त्यांना स्टार प्रचारकाच्या (Star campaigner) यादीतून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. निरुपम यांच्यासाठी हा मोठा झटका आहे. त्याचप्रमाणे त्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याचीही शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीच (Nana Patole) याबाबत माहिती दिली.

Sanjay Nirupam
Delhi Political News : ‘आप’च्या अडचणी थांबेनात; भाजप आतिशी यांना अडकवणार?

संजय निरुपम यांना महाराष्ट्र (Maharashtra News) स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवण्यात आले आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईही केली जाईल. आज किंवा उद्या सकाळपर्यंत ही कारवाई होईल. त्यानंतर त्यांना जिथे जायचे असेल तिथे जाऊ शकतात, असे पटोले यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेने उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून (Congress) लढण्यासाठी निरुपम इच्छुक होते. कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निरुपम यांनी मीडियाशी बोलताना कीर्तिकरांसह काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली होती. त्यांनी पक्षाला अल्टिमेटमही दिला होता.

आपण खिचडी चोराचा प्रचार करणार नसल्याचे निरुपम म्हणाले होते. काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बळी पडली आहे. हे मी मान्य करणार नाही. मुंबईत ठाकरेंची ताकद आता राहिली नाही. त्यांचे सर्व उमेदवार पराभूत होतील. मी काही दिवस वाट पाहणार आहे. माझ्याकडे अनेक पर्याय आहेत, असेही निरुपम यांनी म्हटले होते.

निरुपम यांनी थेट पक्षनेतृत्वाला आव्हान दिले होते. त्यांच्या या भूमिकेनंतर राज्यातील पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. आज त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात आला असून, तसा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींना पाठवला जाणार असल्याचे समजते. दरम्यान, संजय निरुपम हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

R

Sanjay Nirupam
Vijender Singh News : काँग्रेसला ‘ठोसा’; बॉक्सर विजेंदर सिंग भाजपच्या ‘रिंग’मध्ये

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com