Sanjay Raut, Devendra Fadnavis, INS Vikrant Scam News Updates
Sanjay Raut, Devendra Fadnavis, INS Vikrant Scam News Updates sarkarnama
मुंबई

INS Vikrant:सोमय्यांनी जमा केलेला निधी फडणवीसांनी निवडणुकीसाठी वापरला!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे नेते, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya)यांच्यावर आयएनएस विक्रांत प्रकरणी (ins vikrant)गंभीर आरोप केले होते. काल (6 एप्रिल) रात्री उशिरा किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज राऊतांनी पत्रकार परिषदेत सोमय्या, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले. (INS Vikrant Scam News Updates)

निवृत्त युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या डागडुजीसाठी किरीट सोमय्या यांनी लोकांकडून निधी गोळा केला. मात्र हा निधी राजभवनात जमा केला नाही, अशी माहिती समोर आली आहे. ''सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावावर निधी जमा केला. हा पैशा सोमय्यांनी बॅकेच्या माध्यमातून चलनात आणला. हा निधी फडणवीसांनी निवडणुकीसाठी वापरला,'' असा आरोप राऊतांनी पत्रकार परिषदेत केला. हा सर्व प्रकार मनी लाँड्रिंगचा असल्याचे राऊत म्हणाले.

सोमय्यांनी राऊतांचे आरोप खोडून काढले आहे. याबाबतचे पुरावे द्या, असे सोमय्यांनी राऊतांना म्हटलं आहे. यावर राऊत म्हणाले, ''आधी हिशेब द्या मग मी पुरावे देतो,'' ''निवृत्त युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या डागडुजीसाठी जमा केलेला निधी हा ७११ खोकी भरतील एवढा होता. शहीदाचा बलिदानाचा लिलाव करु सोमय्यांनी हा पैसा जमा केला होता,'' असे राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले, ''आयएनएस विक्रांतबाबत देशभावना आहेत. शहिदाचा बलिदानाचा पैशाचा लिलाव करुन सोमय्यांनी पैसा जमा केला आहे,सोमय्यांचा मुखवटा गळून पडला आहे. सोमय्यांना अटक व्हावी, यासाठी शिवसेना राज्यभर आंदोलन करणार आहे. देशाचं संरक्षण करणं हे महाराष्ट्राचं कर्तव्य आहे,'' ''राज्यात जर कुणी गद्यार निपजला असेल तर त्याला जमिनीत गाडण्यात येईल,'' असा इशारा राऊतांनी दिला.

आयएनएस विक्रांत या युद्धनैाकेच्या डागडुजीसाठी सोमय्यांनी अभियान सुरू केले होते. या अभियानतून जमा केलेले कोट्यावधी रुपये राज्यपाल यांना देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, हे पैसे राज्यपाल यांना न देता आर्थिक सहाय्यता अपहार केल्याप्रकरणी सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील याच्या विरोधात कलम ४०६, ४२०, ३४ भा द वि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT