मुंबई : वर्षभर काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आसावरी जोशी (asavari joshi) यांनी राष्ट्रवादीमध्ये (NCP)प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आसावरी जोशी या राष्ट्रवादीत सामील झाल्या आहेत. चित्रपटसृष्टी, कलाकार आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचं आसावरी यांनी सांगितले.
''राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अत्यंत गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे कलाकार, लोककलाकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मला हा पर्याय योग्य वाटतो,'' असे जोशी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
आसावरी यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान: शोध अस्तित्त्वाचा’ या मालिकेत भूमिका साकारत आहेत. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत आसावरी जोशी यांच्यावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी आसावरी जोशी यांनी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
‘ऑफिस ऑफिस’या विनोदी मालिकेमुळं आसावरी जोशी घराघरात पोहचल्या. या मालिकेतील 'उशा' ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांची ही व्यक्तिरेखा खूप गाजली. आसावरी जोशी यांनी ‘माझं घर माझा संसार’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.‘एक रात्र मंतरलेली’,‘गोडी गुलाबी’, ‘बाल ब्रम्हचारी’आदी चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
यापूर्वी सविता मालपेकर, प्रिया बेर्डे, विजय पाटकर, सिद्धेश्वर झाडबुके, प्रियदर्शन जाधव, संभाजी तांगडे, वैशाली माडे, सुरेखा पुणेकर, सुरेखा कुडची आदी कलाकारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.