Sanjay raut, Sunil Raut Latest News Sarkarnama
मुंबई

संजय राऊत भेटल्यावर फक्त तीनच प्रश्न विचारतात...

Sanjay raut : माझी आई 84 वर्षांची आहे...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांनी आज (ता.१२ ऑक्टोबर) आपल्या आईला भावनिक पत्र लिहलं असून हे पत्र राऊत यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर देखील शेअर करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या या पत्राची जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान, त्यांच्या या पत्रावरच संजय राऊत यांचे बंधू आणि उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी संजय राऊत आपल्याला भेटल्यावर फक्त तीनच प्रश्न विचारत असल्याचे सांगितले आहे. (Sanjay raut, Sunil Raut Latest News)

सुनील राऊत म्हणाले,आमचे बंधू संजय राऊत हे दौऱ्यावर असताना त्यांची भेट व्हायची नाही. पण आता तीन महिने झाले त्यांची आईशी भेट झाली नाही. माझी आई 84 वर्षांची आहे. त्यामुळे ती कोर्टाच्या प्रत्येक सुनावणीला येऊ शकत नाही. जेव्हा मला ते (संजय राऊत) भेटतात त्यावेळेस ते मला तीनच प्रश्न विचारतात. आपला शिवसेना पक्ष कसा आहे?, उद्धव ठाकरे कसे आहेत? आणि आई कशी आहे,असे आमदार सुनील राऊतांनी सांगितले.

दरम्यान, जवळपास तीन महिने झाले संजय राऊत हे न्यायालयीन कोठडी मध्ये आहेत. त्यामुळे त्यांची त्यांच्या आईंशी भेट होत नसल्यामुळे त्यांनी आज आईच्या नावे भावनिक पत्र लिहिलं आहे.

अंधेरी पोट निवडणुकीसंदर्भात बोलतांना सुनील राऊत म्हणाले की, शिंदे गटाकडून दबाव तंत्र वापरले जात आहे. मात्र, आमच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय हा निश्चित असल्याने शिंदे गटाकडून हे दबाव तंत्र वापरलं जात आहे.आम्ही न्यायालयात या प्रकरणासंदर्भात दाद मागितली असून विजय आमचाच होणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT