Sanjay Raut : आई..मी लवकरच परत येईन...संजय राऊत यांचं आईला भावनिक पत्र...

Sanjay Raut : मला बेईमानांच्या यादीत जायचं नाही.
Sanjay Raut & his Mother Latest News
Sanjay Raut & his Mother Latest NewsSarkarnama

पुणे : शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे गेल्या काही दिवसांपासून ते ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे तुरूगांत आहेत.

दरम्यान, त्यांनी आज आपल्या आईला भावनिक पत्र लिहलं असून हे पत्र राऊत यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या या पत्राची जोरदार चर्चा होत आहे. (Sanjay Raut & his Mother Latest News)

Sanjay Raut & his Mother Latest News
मुख्यमंत्रिपदावरून उपमुख्यमंत्रिपदावर कसे आले, हे फडणवीसांनी आधी बघावे..

संजय राऊत यांनी आईला लिहलेल्या या पत्रातून भावनिक साद घातली आहे. आई मी नक्कीच परत येईन,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मागील अनेक वर्षांपासून तुला सविस्तर पत्र लिहिलं नव्हतं, पण केंद्र सरकारने पत्र लिहिण्याची संधी दिल्याचा टोलाही त्यांनी पत्रामार्फत लगावला आहे.

Sanjay Raut & his Mother Latest News
निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवणार मशाल की ढाल-तलवार ? काय म्हणाल्या, ऋतुजा लटके

राऊत आपल्या पत्रात म्हणाले, शिवसेनेचे व स्वाभिमानाचे बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले. मराठी बाणा तुझ्याकडूनच मी शिकलो. शिवसेना आणि बाळासाहेबांशी बेईमानी करायची नाही, हे तूच आमच्या मनावर कोरलं. आता त्याच मुल्यांसाठी लढण्याची वेळ आली असून. त्यात संजय कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू? मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य नसते, असे त्यांनी म्हटले आहे.

तर ईडी, प्राप्तिकर विभागाच्या भयाने बरेच आमदार, खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेईमानांच्या यादीत जायचं नाही. 'नॅशनल हेराल्ड'प्रकरणी सोनिया व राहुल गांधींचाही छळ सुरू आहे. रोहित पवार यांनाही त्रास दिला जातोय. या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील व नव्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल. मात्र लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल. आई मी नक्कीच परत येईन, असे संजय राऊतांनी आईला लिहलेल्या पत्राच म्हटलं आहे. तसेच आपल्या पत्रामार्फत त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर देखील प्रहार केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com