Sanjay Raut, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Abhishek Ghosalkar Shot Dead : 'गृहमंत्री अदृश्य, पोलिस शिंदे गँगच्या सेवेत अन्...', संजय राऊतांचा उद्रेक

Abhishek Ghosalkar Firing : घोसळकरांचा बोरिवलीतील रूग्णालयात मृत्यू झाला. यानंतर संजय राऊतांनी थेट ट्वीट करत टीकास्र डागलं आहे.

Akshay Sabale

शिवसेना ( ठाकरे गट ) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर ( Abhishek Ghosalkar ) यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्यावर गोळीबार केलेल्या मॉरिस नोरोव्हानं स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. Abhishek Ghosalkar Shot Dead

संजय राऊतांनी 'एक्स' अकाउंटवर ट्वीट केलं आहे. संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे, असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात. पक्षात प्रवेश देतात. गृहमंत्री अदृश्य झाले आहेत... राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत! फडणवीस राजीनामा द्या!"

संजय राऊतांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे. "महाराष्ट्रात गुंडा राज! अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिश नरोन्हा चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता. मुख्यमंत्री त्याला भेटले. मॉरिश याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले! (वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय) आज त्याने अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला! फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी! राजीनामा द्या!," असं संजय राऊतांनी म्हटलं.

दरम्यान, संजय राऊत 'एक्स' अकाउंटवर गुंडांचे फोटो टाकून सरकारवर टीकास्र डागत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसी कुख्यात गुंड हेमंत दाभेकर भेट घेतल्याचं फोटो संजय राऊतांनी ट्वीट केला होता. तसेच, मुख्यमंत्र्यांबरोबर पुण्यातील कुख्यात गुंडाचे फोटोही संजय राऊतांनी शेअर केले होते.

नेमकं प्रकरण काय घडलं?

गोळीबारापूर्वी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरोन्हा यांनी फेसबुक लाईव्ह केलं होतं. त्यानंतर मॉरिस उठला आणि त्यानं अभिषेक यांच्यावर गोळीबार केला. यात अभिषेक यांना चार गोळ्या लागल्या होत्या. तर, मॉरिसने स्वत:वर चार गोळ्या झाडून घेतल्या होत्या.

यानंतर अभिषेक यांना बोरिवलीतील करूणा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण, उपचारावेळी अभिषेक यांचा मृत्यू झाल्याची माहिती रूग्णालयानं दिली आहे. तसेच, मॉरिसचाही यात मृत्यू झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT