Sanjay Raut | Raj Thackeray | Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray: ठाकरे बंधुंमध्ये बिनसलं! राज ठाकरेंच्या नाराजीवर संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, आम्ही...

Sanjay Raut on Raj Thackeray : मराठी भाषा आणि मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्त एकत्र आलेले ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये महापालिका निवडणुकीनंतर काहीशी नाराजी असल्याचं दिसून येत आहे.

Amit Ujagare

Raj Thackeray: मराठी भाषा आणि मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्त एकत्र आलेले ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये महापालिका निवडणुकीनंतर काहीशी नाराजी असल्याचं दिसून येत आहे. त्यातच आता स्वीकृत नगरसेवकपद न दिल्यानं मनसेची ठाकरेंवर अधिकच नाराजी वाढली आहे. इतकंच नव्हे यामुळं राज ठाकरे यांनी शिवसेनेनं दिलेला एक महत्वाचा प्रस्तावही धुडकावून लावला आहे, पण या वाढत्या नाराजीवर आता ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

नेमका विषय काय?

मराठी भाषा आणि मराठी माणूस या मुद्द्यावर लढलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे युतीमध्ये शिवसेनेला ६५ जागांवर विजय मिळाला तर मनसेला केवळ ६ जागाच मिळाल्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ठाकरेंसाठी हा आकडा समाधानकारक असला तरी मनसेसाठी मात्र नाराजी ओढवणारा आहे. पण यामुळं महापालिकेतील स्विकृत नगरसेवकपदांची गणितं बदलली, त्यामुळं महापालिकेतील १० स्विकृतनगरसेवकांपैकी ठाकरेंच्या वाट्याला ३ पदं आली आहेत. यांपैकी एक स्विकृत नगरसेवकाची जागा मनसेला सोडावी अशी इच्छा मनसेच्या नेत्यांनी व्यक्त केली होती. पण ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसे नेत्यांची ही इच्छा धुडकावून लावत तिन्ही जागांवर आपल्याच पक्षांचे उमेदवार दिले. त्यामुळं राज ठाकरेही नाराज झाले आहेत.

पण या बदल्यात शिवसेनेनं प्रभाग समिती अध्यक्षपदाचा प्रस्ताव मनसेसमोर ठेवला होता. पण स्वीकृत नगरसेवकपद शिवसेनेनं मिळू न दिल्यानं राज ठाकरेंनी प्रभाग समिती अध्यक्षपदाचा शिवसेनेचा प्रस्ताव धुडकावून लावला. प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. पण आता मनसेनं या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं राज ठाकरे प्रचंड नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

दरम्यान, राज ठाकरेंच्या या नाराजीवर आता संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. राऊत म्हणाले, "असं असेल तर आम्ही सर्वजण नक्कीच राज ठाकरेंची भेट घेऊ, त्यांच्याशी चर्चा करु, त्यांच्याशी बोलू. मी तर त्यांच्या भेटीला नेहमीच जातो, उद्धव ठाकरे देखील जातील आणि राज ठाकरे देखील येतील त्यामुळं आम्ही एकत्रच आहोत"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT