BJP News : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दिग्गज नेत्यांना धक्का देत या यादीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. उमेदवारांमधून भाजपने सामाजिक इंजिनिअरींग देखील साधल्याचे दिसून येते.
विनोद तावडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. भाजपमधील मराठा चेहरा म्हणून पूर्वी त्यांचेकडे पाहिले जात होते. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस करत त्यांना राष्ट्रीय स्तरावरची जबाबदारी देण्यात आली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देत त्यांनी आपल्या नेतृत्त्वाची चमक दाखवली होती.
आरपीआयचे प्रमुख, मंत्री रामदास आठवले यांना देखील भाजपच्या कोट्यातूनच राज्यसभेची जागा मिळाली आहे. आठवलेंच्या रुपाने भाजपने बौद्ध समाजाला जवळ करण्याचे राजकारण सुरू केले होते. त्याला आता यश मिळताना दिसत असल्याची चर्चा आहे.
तर, राष्ट्रवादीतून काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले मराठवाड्यातील हिंगोली जिल्हयातील भाजपचे नेते, माजी आमदार रामराव वडकुते यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी देत धनगर समजाला नेतृत्व दिले आहे.
भाजपची उमेदारांची यादी पाहिली तर तावडेंच्या रुपानं मराठा, आठवलेंच्या रुपानं बौद्ध, वडकुतेंच्या माध्यमातून धनगर आणि माया इवनातेंच्या रुपानं आदिवासी समाजाला नेतृत्व करण्याची संधी दिल्याचं दिसून येत.
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा, धनगर आणि दलित मतं निर्णायक ठरत आहेत. त्यामुळे या समाजाला राज्यसभेत नेतृत्व देत भाजपने आपले राजकीय समीकरण आगामी निवडणुकांसाठी जुळवण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.
आदिवासी समाजाच्या नेत्या, नागपूरच्या माजी महौपर माया इनवनाते यांना उमेदवारी देत भाजपने आदिवासी समाजाला नेतृत्व दिले आहे. इवनाते या नागपूरच्या विद्यमान नगरसेवक देखील आहेत. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याच्या अनुभव आहे. अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.