Raj Thackeray : राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर नाराज, 'तो' प्रस्ताव नाकारला, तटस्थ राहण्याचा निर्णय!

Raj Thackeray reaction to Shiv Sena proposal : प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिला आहे.
Raj Thackeray and Uddhav Thackeray political differences
Raj Thackeray and Uddhav Thackeray political differencesSarkarnama
Published on
Updated on

Mumbai political updates: मुंबईच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकीत एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांनी प्रभाग समिती अध्यक्षपदाबाबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आलेल्या प्रस्ताव नाकारत नाराजी व्यक्त केली आहे. प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे.

प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी आज अर्ज भरले जाणार आहे. मात्र, स्वीकृत नगरसेवकपद न मिळाल्याने मनसेचे कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर नाराज होते. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रभाग समिती अध्यक्षपदाचा प्रस्ताव मनसेला दिला होता. मात्र, स्वीकृत नगरसेवकाची इच्छा पूर्ण न झाल्याने राज ठाकरेंनी हा प्रस्ताव नाकारत नाराजी व्यक्त केली. या बाबात साम टिव्हीने वृत्त दिले आहे.

महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले होते. मात्र, त्यांना महापालिकेत सत्ता स्थापन करता आली नाही. शिवसेना आणि भाजप युतीला बहुमत मिळाले. ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक विजयी झाले आहेत. तर, मनसेचे सहा नगरसेवक विजयी झाले होते.

Raj Thackeray and Uddhav Thackeray political differences
इराणमध्ये 165 शाळकरी मुलींचं एकाच वेळी दफन; JCB ने खोदलेल्या कबरींचे फोटो पाहून जग हादरलं!

स्वीकृत नगरसेवकांची संख्या महापालिकेत 10 आहेत. त्यातील तीन सदस्य हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत. मात्र, या तीन पैकी एका जागा त्यांनी मनसेला सोडावी, अशी इच्छा मनसे नेत्यांनी व्यक्त केली होती. मात्र, ठाकरेंनी तीनही जागांवर आपले उमेदवार देत मनसेला संधी दिली नाही. तेव्हापासून ठाकरेंच्या शिवसेनेविषयी मनसेतून नाराजी व्यक्त केली जात होती.

कोणाकडे किती स्वीकृत नगरसेवक

  • भाजप - 4

  • शिवसेना (शिंदे) - 1

  • काँग्रेस - 1

  • शिवसेना ठाकरे - 3

  • एमआयएम - 1

Raj Thackeray and Uddhav Thackeray political differences
Modi Foreign Policy Controversy : 'पंतप्रधानांना बाहेर थांबावं लागायचं…'; मंत्री विखेंनी सोनिया गांधींना सुनावली जुनी आठवण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com