amit shah | sanjay raut sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : अमित शहांना भेटल्याच्या वृत्तावर राऊत चांगलेच भडकले; म्हणाले, “आमच्यावर शंका घेणारे एका...”

Sanjay Raut On Mahavikas Aghadi Seat Sharing : महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप ठरलं नाही. मात्र, आमच्या 210 जागांवर एकमत झालं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Akshay Sabale

विधानसभेपूर्वी काँग्रेस आणि शिवसेनेत ( ठाकरे गट ) जागांवरून ठिणग्या पडत आहेत. यावरून महाविकास आघाडीत ‘बिघाडी’ होण्याची चिन्हे वर्तवण्यात येत आहेत. यातच शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट घेऊन चर्चा केल्याचं वृत्त काँग्रेसमधील सूत्रांनी दिलं होतं. मात्र, संजय राऊत यांनी हा दावा खोडला असून ते चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले, “मी अमित शहांना भेटल्याचं वृत्त हास्यास्पद आहे. हा दावा काँग्रेस नेत्यांनी केला असेल, तर खरोखरच आश्चर्यं वाटते. आम्हाला तुरुंगात टाकलं, पक्ष फोडला, सरकार पाडलं, चिन्ह चोरलं. त्याहीपेक्षा हा महाराष्ट्र गद्दारांच्या हाती दिला. ही वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला आहे.”

स्वार्थासाठी स्वाभिमानावर शिंतोडे उडविणारे...

“आमच्यावर शंका घेणारे एका बापाची औ***** नाहीत. मग ते कोणत्याही पक्षाचे असो. त्यांनी त्यांचा बाप दाखवावा नाहीतर श्राद्ध घालावं. स्वत:च्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानावर शिंतोडे उडविणारे हे लोक आहेत. याला गां****** म्हणतात,” असं म्हणत संजय राऊत वृत्त पसवणाऱ्यावर भडकले.

औरंगजेब अन् अफझलखानशी हातमिळवणी करणे...

“शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्याशी हातमिळवणी आम्ही करणार नाही. त्यांच्याशी हातमिळवणी करणे म्हणजे औरंगजेब, अफझलखानशी हातमिळवणी करणे आहे. कोणतीही शहनिशा न करता अफवा पसरविण्यात येत आहेत,” असं संजय राऊतांनी म्हटलं.

आम्ही छातीठोकपणे करतो...

“आम्हाला जे करायचं आहे, ते छातीठोकपणे आम्ही करतो. अशाप्रकारची गां**** करून राजकारण  करण्याची शिवसेनेची औ**** नाही,” असंही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT