Abhijit Wanjarri : नाही म्हणजे नाही! दक्षिण नागपूर ठाकरेंना न देण्याचे कारण आमदाराने सांगितले

Abhijit Wanjarri Congress uddhav thackeray : काँग्रेसचे नागपुरातील सर्वच आमदार दिल्लीला जाणार आहोत. तसेच विदर्भातील जास्तीत जास्त जागा काँग्रेसने लढाव्या अशी मागणी आम्ही करणार आहोत.
Abhijit Wanjarri uddhav thackeray
Abhijit Wanjarri uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

Abhijit Wanjarri News: दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद टोकाला गेले आहेत. दोघांनीही दक्षिण नागपूर मतदारसंघावरील दावा सोडण्यास ठाम नकार दिला आहे. त्यामुळे हा वाद दिल्लीत पोहचला आहे.

दक्षिण नागपूर मतदारसंघ शिवसेनेला (यूबीटी) दिल्यास सांगली पॅटनर्चा इशारा नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी दिला होता. आमदार वंजारी यांनी इलेक्टिव्ह मेरीट काँग्रेसकडेच असल्याचा सांगून शिवसेनाला (यूबीटी) जागा सोडण्यास नकार दिला आहे.

दक्षिण नागपूर, रामटेक, कामठी यासह विदर्भातील बारा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत चांगलेच बिनसले आहे. नेत्यांमध्येही वाद सुरू आहेत. आघाडीत मेरीटनुसार जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. दक्षिण नागपूरमध्ये मेरिट काँग्रेसच्या बाजूने आहे. यापूर्वीच्या निवडणुकीचा निकाल आणि शिवसेनाला मिळालेल्या मतांची आकडेवारी तपासावी, असा सल्लाही अभिजित वंजारी यांनी दिला.

Abhijit Wanjarri uddhav thackeray
Ajit Pawar : अजितदादांचा ठाकरेंना मोठा धक्का; पुण्याच्या जिल्हाप्रमुखांनाच फोडले

स्व. गोंविदराव वंजारी हे दक्षिणेतून निवडूण आले होते. त्यानंतर काँग्रेसचे दीनानाथ पडोळे या मतदारसंघात पंधरा वर्षे आमदार होते. शिवसेनेला एकदाही हा मतदारसंघ जिंकता आला नाही. 2003 च्या निवडणुकीत काँग्रेसचे गिरीश पांडव अवघ्या साडेतीन हजार मतांनी पराभूत झाले. त्यामुळे हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे. तो सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे अभिजित वंजारी यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे नागपुरातील सर्वच आमदार दिल्लीला जाणार आहोत. विदर्भातील जास्तीत जास्त जागा काँग्रेसने लढाव्या अशी मागणी आम्ही करणार आहोत. काँग्रेसच्या उमेदवाराला यापूर्वी मिळालेली मते, नगरसेवकांची संख्या, संख्याबळ असलेल्या जागा आम्ही मागतो आहोत, असे वंजारी म्हणाले.

रामटेक विधानसभा मतदारसंघाची मागणीसुद्धा आमची आहे. येथील शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. लोकसभा मतदारसंघात खासदारसुद्धा आता शिवसेनाचानाही. त्यामुळे जिल्ह्याचा आमदार या नात्याने नागपूर जिल्ह्यातील सर्व जागांची मागणी आम्ही केली असल्याचे वंजारी यांनी सांगितले.

Abhijit Wanjarri uddhav thackeray
Sunil Tingre: धाकधूक वाढली! वडगाव शेरी भाजपाच्या वाट्याला? सुनील टिंगरेंनी घेतली दादांची भेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com