Purva Walse Patil News : विधानसभा निवडणुकीच्या तयारीत दिलीप वळसे पाटील व्यग्र आहेत. राष्ट्रवादीमधील फूटीनंतर ते शरद पवारांची साथ सोडत अजित पवार यांच्यासोब गेले. मात्र, दिलीप वळसे पाटील एका ठिकाणी बोलताना म्हणाले 'शरद पवार यांना सोडायचा प्रश्नच येत नाही. बऱ्याच लोकांना आतल्या गोष्टी माहीत नसतात.परिस्थितीप्रमाणे राजकारण हातळायचे असते'
दिलीप वळसे पाटील यांच्यानंतर त्यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी देखील शरद पवारांच्या विषयी मोठे वक्तव्य केले आहे.'आदरणीय पवारसाहेब काल ही आपले दैवत होते, आजही आपले दैवत आहेत आणि उद्याही आपले दैवत राहणार.', असे पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या आहेत.
'दिलीप वळसे पाटीलसाहेब हे जेव्हा 25 वर्षांचे होते तेंव्हापासून ते शरद पवारसाहेबांच्या सोबत काम करत आहेत. त्यांना त्यांच्या वडिलांचा जेवढा सहवास लाभला नाही तेवढा शरद पवारसाहेबांचा लाभला. आपलं भांडण, आपला वाद शरद पवारसाहेबांच्या सोबत सुप्रियाताईंच्या सोबत अजिबात नाहीये. आमचे गेले 50 वर्षांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत.', असे देखील पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या.
दिलीव वळसे पाटील म्हणाले, राजकारण हे परिस्थितीनुसार हातळायचे असते. पवारसाहेब आपले दुश्मन झाले आपण त्याचे दुश्मन झालो, असे अजितबात नाही. त्यांच्या बद्दलचा आदर, प्रेम आपल्या मनामध्ये कायम आहे.
आंबेगाव मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार असणार आहे. तर, त्यांच्या विरोध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून देवदत्त निकम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.