Prasad Lad, Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election: नटरंगी ना**, जनता चपलेने...; राऊतांच्या मोदींवरील 'त्या' वक्तव्यामुळे लाड आक्रमक

सरकारनामा ब्यूरो

Prasad Lad On Sanjay Raut: भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांना नटरंगी नाच्या म्हणत राऊतांना जनता चपलेने मारेल, असं वक्तव्य लाड यांनी केलं आहे. खासदार संजय राऊत हे आपल्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. राऊत भाजपवर (BJP) सतत टीका करत असतात. ते केंद्र सरकारच्या धोरणांवरही टीका करतात. अशातच आता त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊतांनी टीका करताना मोदींची तुलना बॉलिवूड अभिनेता जॉनी लिवरशी (Johnny Lever) केली आहे. राऊतांच्या या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "पंतप्रधान मोदी मेरठ येथील भाजपच्या (BJP) जाहीर सभेत म्हणाले, भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. मोदींनी हा सर्वात मोठा जोक केला आहे. ते दररोज असा एक विनोद करतात. त्यांचे विनोद ऐकले की वाटतं, देशात जॉनी लिवरनंतर (Johnny Lever) कोणी मोठा विनोदी कलाकार असेल, तर ते मोदी आहेत. हा गुजरातचा लिवर आहे, जो आमचं मनोरंजन करतोय."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय राऊतांनी मोदींची तुलना जॉनी लिवरशी केल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले असून, त्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. भाजपचे नेते तथा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) राऊतांवर टीका करताना म्हणाले, "नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देशातील 130 कोटी जनतेचा स्वाभिमान आहेत. देशाचे पंतप्रधान मोदींवर हीन भाषेत टीका करणाऱ्या संजय राऊत नावाचा नाच्याला हे माहीत नाही. सकाळी उठून लिपस्टिक, पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही बोललं जातं. पंतप्रधानांचा अपमान केला जातोय, अरे नटरंगी नाच्या महाराष्ट्र, देशातील जनता तुला चपलेने मारल्याशिवाय, तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प राहणार नाही." लाड म्हणाले, संजयजी तुम्ही अशा प्रकारचं हीन कृत्य परत केलं, तर मी तुम्हाला जी म्हणणार नाही. संज्या तुला सांगतो, मी तुला मी सोडणार नाही, असा इशारा प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी राऊतांना दिला.

पंतप्रधान मोदींनी मेरठच्या सभेत नेमकं काय म्हटलं होतं?

रविवारी (३१ मार्च) मोदींनी मेरठ येथील जाहीर सभेत बोलताना विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. या वेळी भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असं वक्तव्य मोदींनी केलं होतं. मोदींच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी मोदीची तुलना अभिनेता जॉनी लिवरशी केली.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT