Arvind Kejriwal News : केजरीवालांनी आपल्याच दोन मंत्र्यांना आणलं अडचणीत? ‘ईडी’चा कोर्टात मोठा दावा

Delhi Liquor Scam Case : ईडीकडून कोर्टात दोन मंत्र्यांची नावे घेतल्यानंतर केजरीवालांनी त्यावर आक्षेप घेतला नाही. त्यामुळे ईडीकडून आता या दोन मंत्र्यांवरही कारवाई होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
Atishi, Saurabh Bharadwaj
Atishi, Saurabh BharadwajSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : दिल्लीतील रामलीला मैदानात रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीची महारॅली पार पडली. विरोधकांनी तपास यंत्रणांसह मोदी सरकारवर या वेळी सडकून टीका केली. या रॅलीसाठी आपकडून प्रचंड मेहनत घेण्यात आली. त्यामुळे प्रामुख्याने केजरीवाल सरकारमधील मंत्री आणि त्यांचे विश्वासू नेते आतिशी आणि सौरभ भारद्वाज आघाडीवर होते. आज हेच दोघे ईडीच्या रडारवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी (Delhi Liquor Scam Case) ईडीने नुकतेच केजरीवालांना अटक केली आहे. आज त्यांची ईडी कोठडी संपत असल्याने त्यांना राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने (ED) त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे कोर्टाने त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Atishi, Saurabh Bharadwaj
Congress News : सुप्रीम कोर्टात काँग्रेसला मोठा दिलासा; करवसुलीबाबत सरकार मवाळ

केजरीवालांना न्यायालयात हजर केल्यानंतर ईडीने कोर्टात मोठा दावा केला आहे. केजरीवालांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ईडीने केला. तसेच चौकशीदरम्यान त्यांनी सरकारमधील मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज (Saurabh Bharadwaj) यांचे नाव घेतल्याचेही सांगितले.

ईडीने म्हटले आहे की, ‘विजय नायर हा आपल्याला नव्हे तर आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना रिपोर्ट करत होतो, असे केजरीवालांनी चौकशीदरम्यान सांगितले आहे.‘ ईडीच्या वकिलांकडून कोर्टाला हे सांगितले जात असताना केजरीवालांनी त्याचे खंडन केले आहे. ते गप्प बसून राहिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घोटाळ्यातील (Scams) पैशांचा वापर गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) केल्याचा आरोप ईडीने केला आहे. आतिशी या त्यावेळी गोवा आपच्या प्रभारी होती. त्यामुळे आता संशयाची सुई आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्याकडे वळल्याची चर्चा आहे. ईडीकडून या दोघांची चौकशी होणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

केजरीवालांची रवानगी तिहार जेलमध्ये

अरविंद केजरीवालांना आज 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे. याआधीच ते ईडीच्या कोठडीत होते. त्यांना 15 एप्रिलपर्यंत तिहारमध्येच राहावे लागेल. या वेळी त्यांनी कोर्टात तीन पुस्तके मिळावीत, यासाठी याचिका केली आहे. त्यामध्ये भगवद्गीता, रामायण आणि हाऊ प्राइम मिनिस्ट डिसाइड या पुस्तकांचा समावेश आहे.

R

Atishi, Saurabh Bharadwaj
Narendra Modi News : …त्यांना पश्चाताप होईल! निवडणूक रोख्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com