Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : ...मग श्रीकांत शिंदे तुमचे पुत्र नाहीत का?

Avinash Chandane

Mumbai Political News :

शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच, असा निकाल काल (१० जानेवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्यानंतर शिवसेनेतील घराणेशाही संपली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्याला आज ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बिनतोड प्रत्युत्तर दिले आहे.

घराणेशाही संपवली म्हणता तर श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) तुमचे पुत्र नाहीत का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. वडील आमदार, मुख्यमंत्री आणि मुलगा खासदार ही घराणेशाही नाही का, असा रोख संजय राऊत यांचा होता.

ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. सहज कुणाला गिळता येणार नाही, असे ठणकावत चोरांना चोर म्हणण्याची पद्धत आहे, हरामखोरांना हरिश्चंद्र म्हणण्याची पद्धत नाही या शब्दांत संजय राऊत यांनी निकालावरून शिंदे गटाचा समाचार घेतला.

त्याचवेळी संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनाही खडेबोल सुनावले. नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं, असा आरोप संजय राऊत यांनी केला. आता संजय राऊतांच्या या टीकेमुळे आता शिंदे गटाकडून तसेच भाजपकडून जोरदार उत्तर मिळण्याची शक्यता सांगितली जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदींमध्ये हिंमत असेल तर...

या वेळी संजय राऊत यांनी अयोध्येतील राम मंदिरावरून सुरू असलेल्या राजकारणाचाही परामर्श घेतला. मणिपूरमध्येही राम मंदिर आहे. पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मणिपूरमधील राम मंदिरात जावे, असे आव्हान राऊतांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT