Shiv Sena MLA Disqualification case : निकालाने वाढवली ठाकरेंची ताकद; पाठीशी विरोधकांच्या एकीचे बळ

Opposition criticized Rahul Narvekar : 'क्रांतीकारी' निकालावरून विरोधकांचे राहुल नार्वेकरांवर टीकेचे बाण
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

जुई जाधव

Mumbai Political News :

शिवसेना एकनाथ शिंदेंचीच (Eknath Shinde) या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या कालच्या निकालानंतर (Shiv Sena MLA Disqualification case) राज्यासह देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. यानंतर सहानुभूती उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) वळली आहे. एवढेच नाही तर राज्यातील भाजपविरोधकही (BJP) ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Rahul Narwekar Verdict : शिवसेनेचा 'निकाल' लागला, आता राष्ट्रवादीची पाळी; 31 जानेवारीला काय होणार?

सत्ताधाऱ्यांना निकाल माहीत होता - पवार

उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निकाल लागल्यावर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. सत्ताधाऱ्यांना हा निर्णय आधीच माहीत होता, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे. शिवाय ठाकरेंनी कोर्टात जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. सत्तेचा गैरवापर केला गेला, आणि तो कसा केला जाऊ शकतो हे राहुल नार्वेकरांनी दाखवले. बाळासाहेब ठाकरे यांनी ही संघटना उद्धव ठाकरेंकडे सोपावली होती. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी कोर्टात जावं. अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.

निकाल की दिल्लीतील गुजरात लॉबीचा ड्राफ्ट? - पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही उद्धव ठाकरे यांचे समर्थन केले आहे. आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला काळीमा फासणारा आहे. संविधानाची पायामल्ली करणारा तसेच 10व्या शेड्युलला डावलणारा निर्णय अध्यक्षांनी दिला असल्याची टीका पटोलेंनी केली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा दिल्लीतील गुजरात लॉबीने लिहून दिलेल्या ड्राफ्ट वाटतो, अशी बोचारी टीका नाना पटोले यांनी केली आहे. या निकालाविरोधात उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला पटोलेंनी दिला आहे.

रात्रीस खेळ चाले...

निकालाच्या आदल्या रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांची एक बैठक रात्री उशिरा झाली. यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली होती. न्यायमूर्ती आरोपीला भेटले, अशी टीका ठाकरेंनी केली होती.

रात्री झालेल्या बैठकीत नेमके काय घडले, याची उत्सुकता सर्वांनाच होती. या बैठकीत निकालाची चर्चा झाली, अशीही वंदता आहे.

(Edited by Avinash Chandane)

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंना धक्का, ....म्हणून शिंदे गटच खरी शिवसेना | Shivsena 16 MLA

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com